महाराष्ट्रातल्या शाळा सोमवारपासून सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली मंजुरी-वर्षा गायकवाड

सौरभ वक्तानिया

• 08:11 AM • 20 Jan 2022

महाराष्ट्रातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भातला जो प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार पहिली ते बारावीचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत. प्रीप्रायमरीचे वर्गही कोरोना नियम पाळून भरवण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने यासंदर्भातला जो प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार पहिली ते बारावीचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत. प्रीप्रायमरीचे वर्गही कोरोना नियम पाळून भरवण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना, संस्था, विद्यार्थी आणि पालकवर्गाकडूनही कोरोनाचा प्रादुर्भान नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेत शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावार देण्याची मागणी होत होती. अशातच आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि त्यापासून लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांतून केली जात होती.

कोरोना नियमांचं पालन करुन राज्यातील शाळा सुरू कराव्यात. त्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे, असं राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. राज्यातील विविध समाजघटकांतून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सातत्यानं मागणी होत होती. त्यावर विचार करुन तशा प्रकारचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं वर्षा गायकवाड यांनी बुधवारी सांगितलं होतं.

    follow whatsapp