राज्यात कोरोनाचं थैमान कायम, पाहा गेल्या २४ तासात किती पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही अटोक्यात येत नसल्याचं दिसून येतंय. कारण आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात ४७ हजार २८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर १५५ पॉझिटिव्ह रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. या सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात साडेचार लाखांहून […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:57 PM • 05 Apr 2021

follow google news

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही अटोक्यात येत नसल्याचं दिसून येतंय. कारण आज पुन्हा एकदा राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात ४७ हजार २८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर १५५ पॉझिटिव्ह रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. या सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात साडेचार लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. हे कठोर निर्बंध आज (५ एप्रिल) रात्री ८ वाजेपासून लागू झाले आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी जवळपास बंद असणार आहेत.

दरम्यान, राज्यात आज २६,२५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २५,४९,०७५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.३६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात १५५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.८३ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रामध्ये लॉकडाउनच ! खासगी कार्यालयं-हॉटेल ते लग्नसोहळ्यांसाठी कडक निर्बंध लागू

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई – ७३ हजार २८१

  • ठाणे- ५७ हजार ६३५

  • पुणे- ८१ हजार ३७८

  • नागपूर- ५५ हजार ९२६

  • नाशिक- ३४ हजार ५४०

  • अहमदनगर- १५ हजार ७१६

  • जळगाव- ७ हजार १४१

  • औरंगाबाद- १६ हजार ८१८

  • लातूर – ७ हजार ७५२

  • नांदेड- ११ हजार २९९

Maharashtra Lockdown : आम्हाला मदत करा नाहीतर आमचं अस्तित्वच संपेल – हॉटेल असोसिएशनची सरकारला विनंती

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतली तर पुण्यात आणि नागपूरमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात ८१ हजारांपेक्षा जास्त रूग्ण तर नागपुरात ५५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.

मुंबईत दिवसभरात ९ हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात ९ हजार ८७९ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात ३ हजार ३५७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण ३ लाख ७४ हजार ९८५ रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८१ टक्के आहे. डबलिंग रेट ४० दिवसांवर गेला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

    follow whatsapp