आता नागपुरातही निर्बंध, शाळा-महाविद्यालयं उद्यापासून बंद

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये निर्बंध लागू करण्यात आले. त्याचप्रमाणे आता नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. मी जबाबदार ही मोहिम शहर आणि जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचंही नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस ७ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:47 AM • 22 Feb 2021

follow google news

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुंबई, पुणे, अकोला, यवतमाळ, अमरावतीमध्ये निर्बंध लागू करण्यात आले. त्याचप्रमाणे आता नागपुरातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. मी जबाबदार ही मोहिम शहर आणि जिल्ह्यात प्रभावीपणे राबवणार असल्याचंही नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस ७ मार्चपर्यंत बंद ठेवणार. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार बंद ठेवणार यातून वृत्तपत्रं, दूध, भाजीपाला, फळं, औषधं या सेवा वगळण्यात आल्या आहेत असंही नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

आणखी काय आहेत नियम?

आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार ७ मार्च पर्यंत बंद ठेवला जाणार

जिल्ह्यातील रेस्तराँ हे ५० टक्के क्षमतेने रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यास संमती

कोविड सेंटर्स पुन्हा सुरू करण्यात येणार

लग्न, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम दिनांक ७ मार्चपर्यंत बंद राहणार

मास्क घातला नसेल तर कारवाई केली जाणार

असे काही नियम आहेत जे नितीन राऊत यांनी जाहीर केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव विदर्भात वाढतो आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बातमी वाचलीत का? – महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यात कोरोना पसरतोय हातपाय!

कोरोना रूग्ण वाढत असल्याने नागपुरात उद्यापासून शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. ७ मार्चपर्यंत हे सगळं बंद असणार आहे. हॉटेल आणि रेस्तराँ हे एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं असंही आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.

    follow whatsapp