कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रचंड झपाट्याने पसरतो आहे-WHO प्रमुख

मुंबई तक

• 07:32 AM • 15 Dec 2021

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता डोकं वर काढलं आहे ते कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने. अशात WHO चे प्रमुख ट्रेडोस अडनॉम ग्रेब्रियेसस यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. जो इशारा काळजी वाढवणारा आहे यात काहीही शंका नाही. जगभरातल्या 77 देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण आढळले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी पहिला मृत्यू युकेमध्ये झाला आहे. ब्रिटनचे […]

Mumbaitak
follow google news

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता डोकं वर काढलं आहे ते कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने. अशात WHO चे प्रमुख ट्रेडोस अडनॉम ग्रेब्रियेसस यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. जो इशारा काळजी वाढवणारा आहे यात काहीही शंका नाही. जगभरातल्या 77 देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण आढळले आहेत. तर दोन दिवसांपूर्वी पहिला मृत्यू युकेमध्ये झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यासंदर्भातली माहिती दिली.

हे वाचलं का?

Omicron: ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा शोध लावलेल्या शास्त्रज्ञांना धमक्या

काय म्हणाले आहेत WHO चे प्रमुख?

कोरोनाचा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट हा कदाचित आधीपासून लोकांमध्ये असेल पण त्याची माहिती नसावी. हा व्हायरस व्हेरिएंट झपाट्याने पसरतो आहे. ही बाब नक्कीच चिंतेची आहे. ओमिक्रॉनचा प्रभाव फारसा होणार नाही, असं म्हणत म्हणत ओमिक्रॉनला कमी लेखणं ही बाब चिंताजनक आहे असंही गेब्रियेसस यांनी म्हटलं आहे. व्हेरिएंटचा धोका फारसा कमी नाही असं मानलं जातं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आजार गंभीर होत नसला तरीही त्यामुळे रूग्णसंख्या वाढली तर आरोग्यसेवेवर ताण येऊ शकतो.

आणखी काय म्हणाले WHO चे प्रमुख?

डेल्टा, डेल्टा प्लस आणि इतर व्हेरिएंटच्या तुलनेपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर बूस्टर डोस महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. पण हा प्रश्न पाथमिकेतचा आहे. यामुळे मृत्यू होत नाही किंवा आजाराचा धोका तसा कमी आहे तरीही अशा व्हेरिएंटसाठी बूस्टर देणं हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र ज्या लोकांना लसीचा पहिला डोसच मिळालेला नाही अशा लोकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. कारण लसपुरवठा कमी झाल्याने अनेकांना अद्याप पहिला डोसही मिळालेला नाही. ज्यांचा पहिला डोसही झाला नाही अशांसाठी हा व्हेरिएंट धोक्याचा ठरू शकतो.

Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी

भारतातही 30 नोव्हेंबरपर्यंत लसीचे एक अब्ज 23 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. पण त्यात लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास 44.8 कोटींच्या पुढे आहे. म्हणजे देशात सुमारे 36.2 टक्के लोकांचंच लसीकरण पूर्ण झालं आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य विभाग आणि कोविन वेबसाईटवरून घेण्यात आली आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरातल्या अनेक देशांची काळजी वाढवली आहे. जगभरात हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ शकते अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. WHO ने ओमायक्रॉन या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे. या व्हेरिएंटबाबत UK च्या वैज्ञानिकांनी एक रिपोर्ट सादर केला आहे. ज्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की जर या व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले नाहीत तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे 25 ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात. लंडन येथील स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण अफ्रिकेच्या स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

    follow whatsapp