शिवसेनेत बंड झालं. महिनाभरापासून राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घटना सुरू आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. बंडखोरीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात गेलं आहे. शिंदेकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दीर्घ भाष्य केलंय. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊतांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिली?
