तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, आता अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar on Tanaji Sawant Statement : तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, आता अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar on Tanaji Sawant Statement

Ajit Pawar on Tanaji Sawant Statement

मुंबई तक

09 Nov 2025 (अपडेटेड: 09 Nov 2025, 04:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही

point

आता अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar on Tanaji Sawant Statement : माजी मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने परांडा तालुक्यात छोटेखानी सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. " ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे. ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं, या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, मी सांगत होतो याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल", असं तानाजी सावंत म्हणाले. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलंय.

हे वाचलं का?

विनाशकाले विपरीत बुद्धी, अजित पवारांचं प्रत्युत्तर 

अजित पवार म्हणाले, याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. यावर आम्हाला काय बोलायचं नाही. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण करतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आम्हाला तो सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे. दुसऱ्याने बेजबाबदारपणा केला, वेडेपणा केला तर त्याला उत्तर देण्याची गरज नाही.

दरम्यान यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तानाजी सावंतांना मंत्री नसल्याने मेंदूला लकवा मारल्यासारख झालं आहे. महायुतीचा धर्म ते विसरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी नीटपणे बोललं पाहिजे. चर्चेत राहण्यासाठी ते आरोप करतात. तानाजी सावंत ही आऊटडेटेड बॅटरी आहे, त्यामुळे शिंदे साहेबांनी त्यांना मंत्रिपद दिलं नाही. 

हेही वाचा : बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवार उमेदवार असतील का? अजित पवारांनी रणनिती सांगितली

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवारांचं भाष्य 

बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक जय पवार लढणार अशा चर्चा मी देखील ऐकल्या आहेत. मात्र तसं काही होणार नाही, असं मी स्पष्ट करतो. बारामतीत याआधी नगरपालिका निवडणुका नेहमी आघाडी करून लढवल्या जात. स्वर्गीय कारभारी आण्णा आणि गुजर साहेब यांच्या काळातही त्यांचे पॅनेल उमेदवार आणत आणि निवडणुका लढवल्या जात. जेही उमेदवार येतील ते पवार साहेबांचेच असतील. मात्र बारामतीने 1991 मध्ये खासदार म्हणून उमेदवारी दिल्यानंतर मी असा निर्णय घेतला की पुढे पक्षाच्या नावे आणि चिन्हावरच निवडणूक लढवावी. आघाडी असल्यास व्हिप लागू करता येत नाहीत त्यामुळे मर्यादा येतात. पक्षाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आल्यानंतर पक्षविरोधी वर्तन आढळल्यास कारवाई करणे शक्य होते. या कारणांमुळे मी नंतर पक्षाच्या चिन्हावरच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि बारामतीकरांनी मला कायम पाठिंबा दिला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस, शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं बच्चू कडूंचा संताप

    follow whatsapp