Dhule Cash Seized : धुळ्यामध्ये रात्री घडलेल्या घटनेनं आज सकाळी महाराष्ट्रभर खळबळ माजवली आहे. जिल्ह्यातील विकासकामांच्या पाहणीसाठी 22 आमदारांचं शिष्टमंडळ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतं. या शिष्टमंडळातले 11 आमदार जिल्ह्यात पोहोचलेले होते. यादरम्यानच, या अंदाज समितीचे अध्यक्ष असलेल्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या रूमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>रूममध्ये कोट्यवधींची रोकड, बाहेर ठाकरेंचे शिवसैनिक... धुळ्याच्या रात्री काय घडलं? A टू Z स्टोरी
धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात 15 मे पासून ही रूम बूक केलेली होती. अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने ही रूम नंबर 102 बूक होती. याच रूममध्ये मोठी रोकड या शिष्टमंडळाला देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गोळा करुन दिल्याची माहिती अनिल गोटेंना मिळते. तिथेच नंतर झालेल्या कारवाईमध्ये ही रोकड सापडली.
कोण आहे किशोर पाटील?
किशोर पाटील असं या खासगी स्वीय सहाय्यकाचं नाव आहे. किशोर पाटील गेल्या 20 वर्षांपासून शासकीय कर्मचारी आहे. विधानभवनात सहाय्यक पदावर ते कार्यरत आहेत. प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून रुजू आहे. पाटील हे 2016 ते 2019 अर्जुन खोतकर राज्य मंत्री असतांना स्वीय सहाय्यक होता. 17 ते 18 वर्षांपासून ते खोतकर यांच्यासोबत आहे. यापूर्वीही खोतकर अंदाज समिती अध्यक्ष असतांना किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम कर होते.
हे ही वाचा >>शिंदेंच्या आमदाराच्या PA च्या रूममध्ये कोट्यवधींचं घबाड सापडलं, सिनेस्टाईल राडा; धुळ्यात काल रात्री काय घडलं?
दरम्यान, धुळ्यात हे प्रकरण घडलं तेव्हा हा स्वीय सहाय्यक रूमला टाळं ठोकून फरार झालेला होता अशी माहिती आहे. या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल गोटे यांचे आरोप खोटे आहेत, या आरोपांमध्ये तथ्य नाही, खोटे आरोप करायची त्यांची जुनी सवय आहे असं खोतकर म्हटले आहे.
ADVERTISEMENT
