ADVERTISEMENT
Bihar Phalodi Satta Bazar Prediction: बिहार विधानसभा निवडणूक 2025च्या सर्व टप्प्यांसाठीचे मतदान पूर्ण झाले आहे. आता आज म्हणजेच 14 नोव्हेंबरला येणाऱ्या निकालांची सर्वांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, विविध सर्वेक्षण संस्था आणि सट्टा बाजारांनी आपापले एग्झिट पोल जाहीर केले आहेत. यात NDA मजबूत स्थितीत दिसत आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, जागांच्या संख्येनुसार RJD सर्वात पक्ष म्हणून समोर येणार असल्याचे दिसत आहे.
Phalodi सट्टा बाजाराचा ताजा अंदाज
राजस्थानातील Phalodi सट्टा बाजाराने बिहार निवडणुकीसाठी 13 नोव्हेंबरला नवीन अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, NDA ला 141 ते 143 जागा मिळू शकतात. काही दिवसांपूर्वी हा अंदाज 146 ते 149 जागांचा होता, जो आता थोडा कमी झाला आहे.
हे ही वाचा>> Bihar Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट
पक्षनिहाय अपेक्षित आकडे असे—
- भाजप: 65 ते 67 जागा
- जेडीयू: 60 ते 62 जागा
- RJD: 69 ते 71 जागा
Phalodi बाजारानुसार सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षांमध्ये RJD सर्वात वर दिसत आहे.
महागठबंधनच्या जागांमध्ये थोडी
सट्टा बाजाराने महागठबंधनसाठी नवा आकडा दिला आहे. आता MGB ला 93 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज आहे. बुधवारपर्यंत हा आकडा 85 ते 89 च्या दरम्यान होता. नवीन अंदाजात महागठबंधनची स्थिती थोडी चांगली दिसत आहे.
हे ही वाचा>> Bihar Election Result: बिहार कोणाचं? थोड्याच वेळात समजणार... एका फेरीत 14 EVM, मतमोजणीला लवकरच सुरुवात
बिहारच्या मतदारांनी रचला इतिहास
यंदाच्या निवडणुकीत बिहारच्या मतदारांनी मतदान दराच्या बाबतीत नवीन विक्रम केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मते, यंदाचे एकूण मतदान 66.91% इतके झाले आहे, जे 1951 नंतरचे सर्वात मोठे प्रमाण आहे.
- पहिला टप्पा: 69.04%
- दुसरा टप्पा: 68.76%
- दोन्ही टप्प्यांचे सरासरी — 66.91%
महिलांचा जबरदस्त सहभाग
निवडणूक आयोगाच्या माहितीप्रमाणे, यंदा महिलांनी उत्कृष्ट मतदान केले आहे. जवळपास 71% महिलांनी मतदान केले, तर पुरुषांची मतदानाची टक्केवारी 62.8% होती. म्हणजेच महिलांनी पुरुषांपेक्षा 8% जास्त मतदान केले.
‘पोल ऑफ पोल्स’मध्ये NDA आघाडीवर
एग्झिट पोल पाहता NDA ला 135 ते 155 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. महागठबंधनला 75 ते 90 जागा मिळू शकतात.
याशिवाय —असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM ला 1–2 जागा
ADVERTISEMENT











