Bihar Election Result: बिहार कोणाचं? थोड्याच वेळात समजणार... एका फेरीत 14 EVM, मतमोजणीला लवकरच सुरुवात
Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (14 नोव्हेंबर) जाहीर केले जातील. राज्यातील 46 केंद्रांवर सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
ADVERTISEMENT

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (14 नोव्हेंबर) जाहीर होणार आहेत. राज्यातील 46 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. प्रथम पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील, ज्या सकाळी 8 ते 8.30 दरम्यान स्कॅन केल्या जातील. सकाळी 8.30 पर्यंत पोस्टल मतपत्रिका मोजणी पूर्ण झाली नाही तरी EVM मतपत्रिकेंची मतमोजणी एकाच वेळी सुरू होतील.
सर्व जिल्ह्यांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंह गुंजियाल यांनी 38 जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसोबत मतमोजणीचा आढावा घेतला आहे. निवडणूक आयोगाने (EC) निश्चित केलेल्या मानकांची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा>> भाजपची नवखी उमेदवार मैथिली ठाकूर होणार पराभूत, Exit Poll मध्ये धक्कादायक निकाल!
एका फेरीत 14 EVM...
मतमोजणी पद्धत आणि रँडमायझेशन: मतमोजणी केंद्रावर प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. एका फेरीत 14 EVM मोजले जातील, ज्यासाठी 14 टेबले लावण्यात आली आहेत. मतमोजणीपूर्वी सकाळी 6 वाजता मतमोजणी केंद्रावर रँडमायझेशन केले जाईल. रँडमायझेशन नंतरच कोणता अधिकारी कोणत्या मतमोजणी टेबलावर ड्युटीवर असेल हे ठरवले जाईल.
हे ही वाचा>> Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये पुन्हा येणार NDA सरकार, पाहा सगळ्या Exit Poll चे आकडे
VVPAT आणि सुरक्षा नियम: मतमोजणीदरम्यान काही तफावत आढळल्यास, VVPAT स्लिप्स मोजल्या जातील. फॉर्म 17C आणि EVM डेटामध्ये जुळत नसल्यास VVPAT स्लिप्स देखील मोजल्या जातील. मतमोजणी परिसरात मोबाइल फोन नेण्यास सक्त मनाई आहे आणि मतमोजणी परिसरात विजय मिरवणूक आणि घोषणाबाजी करण्यासही मनाई आहे.










