Chandrakant Patil on Jayant Patil : "कोणीतरी अर्थमंत्री असताना ऑनलाईन लॉटरीचा घोटाळा झाला. तो घोटाळा देवेंद्र फडणवीसांच्या कृपेमुळे दबला. त्या ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची चौकशी सुरु करावी लागेल", असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. सांगली जिल्हा भाजप कार्यालय उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पार पडलं. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाय जयंत पाटलांना इशारा सभेने उत्तर देणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
जयंत पाटलांच्या आई-वडिलांविरोधात बोलू नको, चंद्रकांत पाटलांकडून पडळकरांना समज
चंद्रकांत पाटील म्हणाले, गोपीचंद (गोपीचंद पडळकर) तुझी गडबड काय आहे? थोड रक्त जास्त गरम आहे. अतिशय डोक्याने चालायचं. राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमस्कार करायचा आणि जयंत पाटलांविरोधात भाषण करायचं. तू वेड्या उलटचं करतो. तू राजारामबापूंवर बोलू नको. जयंत पाटलांच्या आई-वडिलांविरोधात बोलू नको. जयंत पाटलांच्या भ्रष्टाचाराविरोधात बोल. 1 तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता जातीयता, विकृत मनोवृत्तीचा रावण आपण जाळणार आहोत. एक सभा देखील होणार आहे. त्यामध्ये कोण काय बोललं होतं याची क्लिप दाखवणार आहे. सुप्रिया सुळे म्हणाला, एकादशीला मटण खायला आवडेल. वारकऱ्यांची चेष्टा करता काय?
देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? चंद्रकांत पाटलांचा सवाल
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापुरात गोपीचंद पडळकरने म्हटलं होतं शरद पवार कोरोनाचा विषाणू आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद आटपून बाहेर पडण्याची वाट पाहात. पत्रकार परिषद संपल्या संपल्या त्यांनी गोपीचंद पडळकरला फोन लावला. त्यांनी त्याला सांगितलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, यापुढे त्यांच्यावर काही बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? पुण्यात, मुंबईत मेट्रो निर्माण केल्या ही त्यांची चूक आहे का? शेतमालाला भाव दिला ही त्यांची चूक आहे का? आता अंगावर आला की, शिंगावर घ्यायचं.
संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर त्यांच्याकडून एबी फॉर्म भरुन घ्यायचा का? ते तुमचे राजे आहेत. त्यांना आपण राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर घेऊ, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. ही आमची संस्कृती आहे. छत्रपतींना सन्मान आम्ही देतो. तुम्ही कधीच पाठवलं नाही. तुम्ही म्हणता, पेशवे राजे ठरवणार का?
हेही वाचा : रात्री उशीरा रुममध्ये बोलवायचा, हिडन कॅमेरे लावायचा, विकृत अध्यात्मिक गुरु स्वामी चैतन्यानंदची कुंडली समोर
ADVERTISEMENT











