उल्हासनगर: भाजप शिवसेनेचेच (शिंदे गट) नेते फोडत आहे.. अशी तक्रार घेऊन शिंदेंचे मंत्री हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. पण त्यांच्या तक्रारीला न जुमानता फडणवीसांनी मंत्र्यांनाच खडे बोल सुनावून टाकले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरच्या एका प्रकरणाचा देखील उल्लेख केला. ते प्रकरण नेमकं काय आणि त्यावरून फडणवीस एवढे का चिडले हे सविस्तर जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
उल्हासनगरमध्ये ठिणगी पडली, प्रकरण पोहचलं CM पर्यंत
एकीकडे बिहारच्या निवडणूक निकालाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे उल्हासनगरमध्ये मात्र शिंदे गटाने एक वेगळीच खेळी करत चक्क मित्र पक्ष असलेल्या भाजपाचं खिंडार पाडलं.
भाजपचे 6 माजी नगरसेवक व शहरातील तीन सर्वात प्रभावशाली व्यक्तींसह शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेना (शिंदे गट) आणि तिचा सहयोगी टीम ओमी कलानी (TOK) मध्ये सामील करू घेतलं होतं.त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर युनिटसाठी हा सर्वात मोठा राजकीय धक्का होता.
हे ही वाचा>> 'आज परत कोणीतरी गावी जाणार…' भाजपने शिंदेंचे नेते फोडताच आदित्य ठाकरेंनी डिवचलं, भलं मोठं ट्वीट अन्...
तर कलानी कुटुंबासाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंटही आहे, कारण TOK ची राजकीय प्रभाव काही महिन्यांत कमकुवत झाला आहे, आता आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि टीओकेमध्ये सहा माजी भाजप नेत्यांच्या प्रवेशामुळे कलानी गटाला नवीन बळ मिळाले आहे.
भाजप सोडलेल्या सहा नेत्यांपैकी किशोर वानवारी आणि मीना सोंडे अधिकृतपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील झाले, तर जमनू पुरसवानी, प्रकाश मखीजा, महेश सुखरामणी आणि चार्ली परवानी टीम ओमी कलानीमध्ये सामील झाले. हे सर्व खासदार श्रीकांत शिंदे आणि टीओके अध्यक्ष ओमी कलानी यांच्या उपस्थितीत पार पडलं
यापैकी तीन नेते भाजपचे सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जात होते:
- जमनू पुरसवानी, पाच वेळा नगरसेवक आणि माजी उपमहापौर
- प्रकाश मखीजा, चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष
- महेश सुखरामणी, महाराष्ट्र साहित्य अकादमीमध्ये राज्यमंत्री पदाच्या समतुल्य
या तिघांच्या जाण्याने भाजपच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का मानला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हा राजकीय संघर्ष तीव्र झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रभावाचे क्षेत्र असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला बळकटी देण्यासाठी तसेच शिंदेंना शह देण्यासाठी चव्हाण यांनीही मोहीम तीव्र केली.
हे ही वाचा>> पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने विरोधकांनी घेरलं, आता भाजपचा मोठा निर्णय
रवींद्र चव्हाण यांनी भाजपला बळकटी देण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेत शिवसेना (शिंदे गट) चे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी सामील झाले, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. यामुळे उल्हासनगरमध्ये शिंदे-कलानी आणि चव्हाण-आयलानी गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी भाजप नगरसेवकांना पुन्हा शिवसेना-टोओके गटात आणण्याची रणनीती अवलंबली. यापूर्वी, भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच टीओके नगरसेवकांना भरती केले होते. आता, शिंदे आणि ओमी कलानी यांनी 6 भाजप नगरसेवकांना आपल्या गटात आणले.
प्रकाश मखिजा यांनी सांगितले की, पूर्वी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र निवडणूक लढवत असत, परंतु महापालिका निवडणुका जवळ येताच वरिष्ठ नेत्यांमधील संघर्ष वाढला, ज्यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान झाले, म्हणूनच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT











