Nagar Parishad Election Result LIVE: हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Hingoli District Nagar Parishad Election Result: हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या 2 नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in hingoli district hingoli kalamnuri nagar parishad election 2025 result

हिंगोली जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

18 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 12:23 PM)

follow google news

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि हिंगोली या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • वसमत - दुसऱ्या फेरी अंती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार 700 मतांनी आघाडीवर आघाडीवर
  • पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आघाडीवर
  • उमेदवार सीमा हाफिज आघाडीवर
  • कळमनुरी - पाहिल्या फेरीअंती शिवसेना शिंदे आघाडीवर
  • पहिल्या फेरीत 2279 मतांनी भाजपाच्या निता बाबाराव बांगर आघाडीवर
  • भाजपाने खातं खोललं नगरसेवक उमेदवार विजयी... प्रभाग 3 मधील उमेदवार विजयी
  • पहिल्या फेरीत 2279मतांनी भाजपाच्या निता बाबाराव बांगर आघाडीवर

---------

1. कळमनुरी

कळमनुरी नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • कळमनुरी - पाहिल्या फेरीअंती शिवसेना शिंदे आघाडीवर

---------------

कळमनुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

----

कळमनुरी नगर परिषदेसाठी एकूण 73 टक्के मतदान झालं

कळमनुरी शहरातील दुपारी 5 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 55.56%

कळमनुरी शहरातील दुपारी 1.30 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 39.72%

कळमनुरी शहरातील सकाळी 11.30 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 24.4%

  • कळमनुरी शहरातील मतदान केंद्रावर गोंधळ 

कळमनुरी नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालं.  येथील उर्दू हायस्कूल या ठिकाणी मतदान केंद्र क्रमांक 8 येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली. दरम्यान मतदान थांबल्यामुळे मतदारांमध्ये एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. अर्ध्या तासांपासून ती मतदान प्रक्रिया थांबली असून निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने मतदान केंद्रावरील मशीन बदलण्याची प्रक्रिया केली जात आहे

कळमनुरी शहरातील सकाळी साडे नऊवाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 8.1%

  • कळमनुरी नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

---

नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि पक्ष

  • आश्लेषा वैभव चौधरी - (शिवसेना)
  • नुरुनीसा बेगम मोहोम्मद नजीम- (राष्ट्रवादी अजित दादा)
  • सुवर्णा चंद्रकांत देशमुख.(शिवसेना Ubt)
  • कैसर बेगम नेहाल कुरेशी - काँग्रेस 
  • वैशाली संजय कावडे(- भाजपा)

2. हिंगोली

हिंगोली नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • पहिल्या फेरीत 2279 मतांनी भाजपाच्या निता बाबाराव बांगर आघाडीवर
  • भाजपाने खातं खोललं नगरसेवक उमेदवार विजयी... प्रभाग 3 मधील उमेदवार विजयी
  • पहिल्या फेरीत 2279मतांनी भाजपाच्या निता बाबाराव बांगर आघाडीवर

--------

हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

---

हिंगोली नगर परिषदेसाठी एकूण 66 टक्के मतदान झालं

हिंगोली शहरातील दुपारी 5 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 50.88%

  • मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील केंद्र क्र. 3 मध्ये जाऊन एका महिलेला मतदान करताना चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केला होता. त्यानंतर विरोधकांकडून आमदार संतोष बांगर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

आता याच प्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी देखील आमदार संतोष बांगर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यानंतर आता आमदार संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत पुन्हा दाखल झाला आहे

हिंगोली शहरातील दुपारी 1.30 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 36.68%

हिंगोली शहरातील सकाळी 11.30 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी - 22.41%

हिंगोली मतदान टक्केवारी 22.41.%

  • हिंगोलीत EVM वर मशाल चिन्ह छोटं दिसत असल्याची तक्रार

हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे कि बाकी चिन्हापेक्षा मशाल हे चिन्ह EVM मशीन छोटं दिसत असून चिन्हाच्या भोवती डाग दिसत आहेत. त्यामुळे मतदान करतांना मतदारांना चिन्ह स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे त्यांना मतदानात फटका बसू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने यावर तोडगा काढावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हिंगोली शहरात सकाळी साडे नऊपर्यंत मतदानाची टक्केवारी 8.63%
 

  • संतोष बांगर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रावर जात घोषणाबाजी करत मतदान केलं त्यानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी यासंदर्भात निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे.

'संतोष बांगर यांनी केलेलं कृत्य आहे लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाऱ्याप्रमाणे भयमुक्त निवडणूक झाली पाहिजे असं ते म्हणाले आहेत. मतदान केंद्रात जाऊन घोषणा करणे महिलेला मतदान करायला लावन हे हे लोकशाहीला न मानवणार आहे. निवडणूक अधिकारी यासंदर्भात तक्रार देत आहेत मी सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला या संदर्भात तक्रार केली आहे.'

'ही निवडणुकीत संतोष बांगर यांनी पैशावर लढवली आहे. त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही. केवळ पैसे देऊन मत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हिंगोलीची जनता दूधखुळी नाही सुज्ञ आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही. संतोष बांगर हे एका मताला पाच हजार देत आहेत.' असा आरोप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे.

'बाकी कुणाकडे काळा पैसा नाही. यांच्याकडे दारू मटका आणि वाळूचे पैसे आहेत तेच पैसे वाटून ते निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत.' असा आरोपही भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे.

  • आमदार संतोष बांगरांची मतदार केंद्रातील वादग्रस्त कृती

आमदार संतोष बांगर यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये आमदार संतोष बांगर हे एका मतदार महिलेला मतदान केंद्रात जाऊन एका महिलेला मतदान करताना बटण दाबण्यासाठी सांगतांना दिसत आहेत.

  • हिंगोली नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

शिवसेनेने भाजपाचा अधिकृत उमेदवार  पळवला

एकीकडे महायुतीतील मित्र पक्षात होत असलेल्या पक्षप्रवेशावरून राजकीय वादंग उठलेल आहे. हा वाद मिटवा म्हणून वरिष्ठ नेत्यांकडून मित्र पक्षातील राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाला बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे हिंगोलीत होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत मात्र शिवसेना भाजपामध्ये चांगलीच जुंपल्याचं बघायला मिळत आहे.

हिंगोली नगरपरिषद मधील प्रभाग क्र 16 (ब)मधील भाजपचे अधिकृत उमेदवार भास्कर रंगनाथ बांगर यांनी निवडणुकीतुन माघार घेतली आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवाराची व्हिडीओ कॉलवर पडताळणी करत उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज स्वीकाराला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेताच भास्कर बांगर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. ऐनवेळी भाजपाचा नगरसेवक पदाचा अधिकृत उमेदवार शिवसेनेने पळावल्याने भाजपला चांगलाच हादरा बसला आहे.

----

हिंगोली-हिंगोलीत भाजपला तिसरा धक्का

भाजपच्या गजानन सोनुळे या उमेदवाराची वार्ड क्रमांक  17 अ मधून माघार.

शिवसेना शिंदेच्या उमेदवाराविरोधात भरला होता अर्ज

----

    follow whatsapp