धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, धाराशिव आणि परंडा या तीन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल
1. तुळजापूर
तुळजापूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-------
तुळजापूर नगर परिषदेसाठी एकूण 80 टक्के मतदान झालं
- तुळजापूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
---
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- विनोद विलास गंगणे - भाजप (शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा)
- अमर अशोकराव मगर - काँग्रेस (महाविकास आघाडीचा पाठिंबा)
- गिरी गोसावी महंत इच्छागिरी महाराज - अपक्ष (राष्ट्रवादी अजित पवार गट आणि पुजारी मंडळ यांचा पाठिंबा)
2. धाराशिव
धाराशिव नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
------
धाराशिव नगर परिषदेसाठी एकूण 61 टक्के मतदान झालं
- धाराशिव नगरपरिषद निवडणूक: पोलीस आणि भाजप नगरसेवक उमेदवारामध्ये वाद
धाराशिव नगरपरिषद हद्दीतील मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात राजकीय प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी कारवाई केली. नियमांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही राजकीय प्रतिनिधी थांबू नये, तसेच मंडप लावू नये, यानुसार पोलिसांनी मंडप हटवून उपस्थित कार्यकर्त्यांना परिसरातून बाहेर जाण्याचे निर्देश दिले.
वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होत असल्याने पोलिसांनी परिसर मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कारवाईदरम्यान भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार सतीश कदम यांनी पोलिसांशी उघडपणे गैरवर्तन व वाद केल्याचा दिसून आले. या घटनेमुळे काही वेळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
- धाराशिव नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
----
धाराशिवमधील मुख्य लढती
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांच्या निवडणुकीत यंदा राजकीय समीकरण पूर्णपणे गुंतागुंतीचे झाले असून महायुती, महाविकास आघाडी, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह स्थानिक सर्वपक्षीय आघाड्या अशी अनेक पातळीवर लढत आकार घेत आहे. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- संगीता सोमनाथ गुरव - शिवसेना (ठाकरे गट) + काँग्रेस
- परवीन खलील कुरेशी - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
- नेहा राहुल काकडे - भाजप
- मंजुषा विशाल साखरे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
शिवसेना शिंदे गटाने 16 ठिकाणी उमेदवार उभे केले असून नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी कोणाशी हात मिळवणे करतात यावर धाराशिवचे राजकीय समीकरण ठरणार आहे.
3. परंडा
परंडा नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-------
परंडा परिषदेसाठी एकूण 78 टक्के मतदान झालं
- परंडा नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
----
तानाजी सावंतांविरोध परांड्यात सर्वपक्षीय एकवटले
शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या भूम-परांडा मतदारसंघात येणाऱ्या दोन्हीही नगर परिषदेमध्ये तानाजी सावंत समर्थक विरुद्ध सर्वपक्षीय एकत्र येत स्थानिक विकास आघाडीची स्थापना करून लढत देताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे, भाजपाचे आमदार सुजित सिंह ठाकूर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिवंगत आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव विश्वजीत पाटील यांनी एकत्र येत पक्षीय मतभेद बाजूला ठेवत महायुतीतील घटक पक्ष भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याशी एकत्र येत विरोधकांची मोट बांधून तानाजी सावंत समर्थक विरुद्ध लढत देत आहेत.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
ADVERTISEMENT











