Nagar Parishad Election Result LIVE: जालना जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Jalna District Nagar Parishad Election Result: जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या दोन नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in jalna district ambad bhokardan nagar parishad election 2025 result

जालना जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

18 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:42 PM)

follow google news

जालना: जालना जिल्ह्यात अंबड आणि भोकरदन या दोन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • परतूरमध्ये 2200 मतांनी भाजपा आघाडीवर
  • अंबड नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या देवयानी कुलकर्णी आघाडीवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार पिछाडीवर
  • भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर
  • भाजपा दुसऱ्या स्थानी
  • काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर
  • अंबड आणि परतूरमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर
  • जालना - परतूर नगर परिषदेत भाजपा आघाडीवर
  • परतूर- भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या प्रियांका राक्षे दोन हजार मताच्या आघाडीवर
  • राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे पिछाडीवर
  • भाजपचे दोन नगरसेवक विजयी

 

--------------------

1. अंबड

अंबड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • अंबडमध्ये भाजपा उमेदवार आघाडीवर

----------------

अंबड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

------

अंबड नगर परिषदेसाठी एकूण 76 टक्के मतदान झालं

  • भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमनेसामने 

अंबड नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक 2 मधील केंद्र क्रमांक 1 वर दोन गट आमनेसामने आल्याचं पहायला मिळालं. आज अंबड नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, अंबड नगर परिषद येथील प्रभाग क्रमांक दोन मधील केंद्र क्रमांक एकवर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमनेसामने आले. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांनी तातडीने दोन्ही गटांना समजवून शांत करत मतदान प्रक्रिया सुरुळीत सुरू केली

  • अंबड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

  1. देवयानी केदार कुलकर्णी - भाजपा
  2. सना मुस्तकिम पटेल - शिवसेना (शिंदे गट)
  3. श्रद्धा शिवप्रसाद चांगले - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), महाविकास आघाडी आणि वंचित युती

2. भोकरदन

भोकरदन नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर
  • भाजपा दुसऱ्या स्थानी
  • काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर

------------

  • भोकरदनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आघाडीवर

-------------

भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

भोकरदन नगर परिषदेसाठी एकूण 76 टक्के मतदान झालं

  • 'भोकरदन नगर परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची छुपी युती'

जालन्याच्या भोकरदन नगर परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची छुपी युती आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी केला. भोकरदन नगर परिषद निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या सल्ल्याने उमेदवार दिलेत, असं देशमुख म्हणालेत. 

आज भोकरदन नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्या दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत भोकरदन नगर परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची छुपी युती असून ती आता उघड झाली असल्याचं म्हटलंय. देशमुख यांच्या सुनबाई प्रियंका देशमुख या काँग्रेस पक्षाकडून भोकरदन नगर परिषद निवडणूक लढवत आहेत. माझ्या विरोधात सगळे पक्ष एकत्र लढत असल्याचं सांगत ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने आम्हीच जिंकणार असा विश्वास देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.

  • विरोधकांची ही निवडणूक लढवण्याची मनःस्थिती नव्हती: दानवे

जालन्याच्या भोकरदन शहरात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. आज राज्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. भोकरदन येथील मतदान केंद्रावर भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी मतदान केलय. या नगर परिषद निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून येतील आणि या निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने राज्यातील 24 ठिकाणांच्या नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिलीय. विरोधकांची ही निवडणूक लढवण्याची मनःस्थिती नव्हती, असं दानवे म्हणालेत. दरम्यान, या निवडणुकीत विरोधकांनी फक्त मतचोरीचा मुद्दा लावून धरला, आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली, असंही दानवे यांनी म्हटलय.

  • भोकरदन नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात

----

जालन्याच्या भोकरदन नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी एकूण 80 उमेदवार रिंगणात

नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज मागे घेतले तर 16 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहेत.

जालन्याच्या भोकरदन नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्य पदासाठी एकूण 80 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेले 5 अर्ज आणि सदस्य पदासाठी दाखल केलेले 16 अर्ज मागे घेण्यात आले आहेत. भोकरदन नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 12 जणांनी, तर सदस्य पदासाठी 154 जणांनी अर्ज दाखल केले होते. तर छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठीचे 2, तर सदस्य पदाचे 58 उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यानंतर 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या 5 उमेदवारांनी, तसेच सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्या 16 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता भोकरदन नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार, तर सदस्य पदासाठी 80 उमेदवार रिंगणात असून यांच्यात निवडणुकीची लढत रंगणार आहे.