भोंदूबाबा खरातसोबतची 'ती' डील तरीही उपजिल्हाधिकारी भांडे-पाटलांची क्रीम खात्यात बदली!

ओमकार वाबळे

• 05:00 AM • 25 Mar 2026

अशोक खरात प्रकरणी अडचणीत आलेले उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली ही महसूल आणि वन खात्यात करण्यात आली आहे.

despite land transaction involving a senior government official wife and ashok kharat deputy collector abhijeet bhande patil has been transferred to revenue department

उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटलांची बदली

Google CTA

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे उघड झाल्यानंतर राजकीय नेत्यांसह बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. कारण अशोक खरात याचे नेते मंडळींसह शासनातील अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार असल्याचे आरोप सातत्याने केले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिच्या नावे केलेल्या एका जमीन व्यवहारात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांच्या पत्नी प्रिती भांडे-पाटील यांचंही नाव भागीदार म्हणून असल्याचं समोर आलं होतं. ज्यानंतर आता सरकारकडून उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पण ही कोणतीही साइड पोस्टिंग नसून अत्यंत महत्त्वाच्या खात्यातच भांडे-पाटलांची बदली करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

अभिजीत भांडे-पाटलांची बदली का करण्यात आली?

पाथर्डी येथील एक जमीन भोंदूबाबा अशोक खरात याची 24 वर्षीय मुलगी तृप्तबाला खरात हिच्या नावावर खरेदी करण्यात आली होती. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची पत्नी प्रिती भांडे-पाटील या देखील भागीदार असल्याचे समोर आले होते. 2022 साली जमिनीचा हा व्यवहार झाला होता. अशोक खरात लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी भांडे-पाटलांच्या पत्नीच्या जमीन व्यवहाराचा नोंदणीकृत दस्तऐवज समोर आणला होता. ज्यामुळे अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसह प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत देखील लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आता सरकारसह प्रशासनावर देखील टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

हे ही वाचा>> भोंदूबाबा अशोक खरात याला रुपाली चाकणकर चक्क 'या' नावाने मारायच्या हाक, कोणी केला दावा?

अशावेळी आता फडणवीस सरकार हे डॅमेज कंट्रोल करत असून त्यासाठी सर्वात आधी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत भांडे-पाटील हे मागील काही वर्षांपासून SRA मध्ये प्रतिनियुक्तीवर होते. पण आता त्यांची बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्यासंबंधीचं पत्रक 24 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

अशोक खरातसोबत नाव जोडलं गेल्याने अभिजीत भांडे-पाटील यांच्यावर बदलीची कारवाई जाईल असा अंदाज मागील काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होता. त्यांना साईड पोस्टिंग दिली जाईल अशी चर्चाही होती. मात्र, शासनाने तूर्तास तरी त्यांची बदली ही अत्यंत महत्त्वाच्या खात्यातच केली आहे.

हे ही वाचा>> भोंदूबाबा खरातचं सगळ्यात घाणेरेडं कृत्य, 'शंकराच्या पिंडीजवळ देखील महिलांना घेऊन...', 'ती' गोष्ट ऐकून तुम्हीही जाल हादरून!

जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अभिजीत भांडे-पाटील हे उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपुप्रा - 1, बांद्रा (शहर), मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीवर होते. मात्र आता त्यांची बदली ही महसूल व वन विभाग, मंत्रालय येथे करण्यात आली आहे.

पाहा अभिजीत भांडे-पाटील यांच्या बदलीचा शासन निर्णय जसाच्या तसा... View PDF

कोण आहेत अभिजित भांडे-पाटील?

अभिजित भांडे-पाटील हे सध्या मुंबईतील एसआरए (Slum Rehabilitation Authority) विभागात कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते या पदावर कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी (18 मार्च) रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी भोंदू खरातला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे अनेक काळे कारनामे उघड झाले. या प्रकरणात रुपाली चाकणकरांना देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच खरातच्या संस्थानावर सरकारने कशी मेहेरबानी दाखवली हे देखील समोर आले आहे.