Devendra Fadnavis on Eknath Shinde hotel politics : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरलाय. मात्र, सत्तेची सूत्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असणार आहेत. कारण महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. भाजपच्या सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेसेनेच्या 29 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक बनले आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने आमचा अडीच वर्षे महापौर करावा, ही मागणी करत हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात केलीये. दरम्यान, हॉटेल पॉलिटिक्सच्या चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता कुठेही पळवा पळवी नाहीये. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाहीये. आम्ही सर्व नगरसेवकांना एकत्रित बोलावलं आहे, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंनी देखील बोलावलं असेल. राहायला वगैरे कोणी जात नाही.
हेही वाचा : ‘..देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल’, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अडीच वर्ष महापौरपद मिळावं, शिंदेसेनेची मागणी
मुंबईत अडीच वर्ष आमचा आणि - अडीच वर्ष भाजपचा महापौर बसवा, असा फॉर्म्युला शिंदेंच्या नगरसेवकांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी मांडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचा महापौर बसावा, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी आता कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्सवर भर देत असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना तीन वाजता बांद्रा ताज लॅंड्स एंडला येण्याचे आदेश देण्यात आले होते.
मुंबई महापालिका निवडणूक निकाल; कोणी किती जागा जिंकल्या?
भारतीय जनता पार्टी – 89
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
इंडियन नॅशनल काँग्रेस – 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – 3
समाजवादी पार्टी – 2
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 1
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











