Eknath Shinde call to MP Sanjay Raut : राज्याच्या राजकारणातून मोठी माहिती समोर आलीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन केलाय. संजय राऊत यांना फोन करुन शिंदेंनी त्यांच्या प्रकृती विचारपूस केल्याची माहिती समोर आलीये. आमदार सुनील राऊत यांच्यामार्फत शिंदेंनी संजय राऊत यांच्याशी बातचीत केलीये. संजय राऊत यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी बिघडली. त्यामुळे त्यांनी दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची फोन करुन विचारपूस केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, तेजस्वी घोसाळकरांना धक्का; तुमच्या वार्डाची स्थिती काय?
संजय राऊत सार्वजनिक जीवनापासून दोन महिने दूर राहणार
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलं होतं. यामध्ये ते म्हणाले, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.
महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











