Eknath shinde : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर महायुतीसह विरोधकांनी कंबर कसली आहे. प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. अशातच आता दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर आज 12 जानेवारी रोजी महायुतीची प्रचारसभा सुरु आहे. या प्रचारसभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. तसेच मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? यापू्र्वी तुम्ही एकत्र आला नाहीत, आता एकत्र आलात. यामध्ये मराठी माणूस नाहीतर ठाकरेंचं राजकारण धोक्यात असल्याचं वक्तव्य करत त्यांनी टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची काढली पिसं, म्हणाले 'हरामXर हरामाचेच पैसे वाटणार..'
'मराठी माणूस धोक्यात नसून ठाकरेंचं राजकारण धोक्यात'
एकनाथ शिंदे यांनी दादरच्या शिवाजीपार्क मैदानावर सभा घेत ठाकरेंवर घणाघात केला. त्यांनी बोलताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, 'मराठी माणूस धोक्यात नसून ठाकरेंचं राजकारण धोक्यात आहे. 25 वर्षात तुम्ही मुंबईतील मराठी माणसांसाठी काय केलं सांगा? कोव्हिडमध्ये मी रस्त्यावर फिरत होतो. तुम्ही घरात बसला होता, घरात बसलेल्यांना काय कळणार. मी कार्यकर्ता झालो आणि आज इथं आलो आहे, या देशात कोणी आहे का असं दाखवून द्या', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र का आले?
त्यानंतर त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र का आले? यापूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा एकत्र यायला काय झालं होतं. महाराष्ट्रासमोर कोणताही वाद छोटा आहे, असं काहीजण म्हणतात, मग तेव्हा का वेगळे झाला होता, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता सुनावलं.
हे ही वाचा : खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणारा प्रकार, बीडमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत केलं लैंगिक शोषण
'यांच्या सरकारच्या काळात खिचडी घोटाळा, लोक कोव्हिडमध्ये मरत होती आणि हे पैसे छापत होते आणि म्हणून, लोकांच्या जिवांशी खेळण्याचे काम केलं', असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली.
ADVERTISEMENT











