Sanjay Shirsat on Balaji Kalyankar, नांदेड : "आम्ही गुवाहाटीला गेलो, त्यावेळेस बालाजी कल्याणकर जेवण करत नव्हते. मी त्याला समजून सांगितले पण तो ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला की, मी वर जाऊन उडी मारतो. आम्ही आमदार गोळा करण्यात परेशान होता. सत्तास्थापनेसाठी आमची संख्या पूर्ण होते की नाही ते आम्ही पाहत होतो. बालाजी जीव देण्याची भाषा करू लागला त्यामुळे त्याच्यामागे दोन माणसे लावली लागली. त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती. आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल? ही चिंता त्यांना सतावत होती. त्याला समजून सांगितलं पण आता बालाजी कल्याणकर हा शिंदे साहेबांच्या खूप जवळचा झाला. आता आमदार बालाजी कल्याणकर खुश आहे", असं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, संजय शिरसाट यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सभागृहात हशा पिकलेला पाहायला मिळाला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 21 वर्षाच्या पोरीची कमालच, भारतीय संघाची रणरागिणी.. ऐनवेळी गेमच फिरवणारी शेफाली आहे तरी कोण?
मंत्री संजय शिरसाट हे नांदेडमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आंबेडकरवादी समाजाने आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते मनमोकळेपणाने बोलले. यावेळी त्यांनी गुवाहाटीतील अनुभवांबद्दल आणि बंडखोरीच्या काळातील घडामोडींवर भाष्य केलं.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी 40 आमदारांसह बंड पुकारत थेट सूरतकडे कूच केली. या “सुरत स्वारी”ने राज्यात खळबळ उडवली. उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. परंतु त्यानंतर गाजला तो गुवाहाटी दौरा. या प्रवासादरम्यान शहाजीबापू पाटलांचा ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील’ हा संवाद प्रचंड गाजला आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. त्या काळात अनेक कथा-किस्से, अफवा आणि धार्मिक विधींवरील चर्चा राज्यभर झाल्या. आजही दिल्लीपासून गल्लीपर्यंत या गोष्टी रस घेऊन सांगितल्या जातात. या सर्व चर्चांमध्ये आता मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या गुवाहाटीतील अनुभवांमधील आणखी एक किस्सा जोडत नव्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











