Nagar Parishad Election Result LIVE: गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल

Gondia District Nagar Parishad Election Result: गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या एका नगरपरिषदेचा संपूर्ण निकाल इथे पाहा.

election result live complete results of nagar parishad  in gondia district gondia nagar parishad election 2025 result

गोंदिया जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल

मुंबई तक

19 Nov 2025 (अपडेटेड: 21 Dec 2025, 01:28 PM)

follow google news

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया या एका महत्त्वाच्या नगर परिषदेचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.

हे वाचलं का?

गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल

  • काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेवार सचिन सेंडे 3200 आघाडीवर
  • भाजपचे कशिश जयस्वाल 2000 मतांनी पिछाडीवर
  • नगरपरिषद/पंचायत निवडणुकीत पाहा कोण आघाडीवर

भाजप-01

शिवसेना-0

राष्ट्रवादी-0

ठाकरे-0

काँग्रेस-0

शरद पवार गट-0

इतर-00

---------------

1. गोंदिया

गोंदिया नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:

  • काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेवार सचिन सेंडे 3200 आघाडीवर
  • भाजपचे कशिश जयस्वाल 2000 मतांनी पिछाडीवर

भाजप-01
शिवसेना-0
राष्ट्रवादी-0
ठाकरे-0
काँग्रेस-0
शरद पवार गट-0
इतर-00

----

गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल

-----

गोंदिया नगर परिषदेसाठी एकूण 62 टक्के मतदान झालं

  • प्रफुल पटेलांनी निवडणूक आयोगाबाबत केली नाराजी व्यक्त

नगरपरिषद निवडणूक मतदानासाठी आज खासदार प्रफुल पटेल सहकुटुंब मतदान केले. यावेळी ते म्हणाले की, 'मी सुद्धा दिल्ली येथे संसद चालू आहे तिथे हजेरी लावली आणि इथं मतदान करायला सहकुटुंब आले आहे. नंतर दिल्लीला पुन्हा जाणार आहे.' 

मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे यावर प्रफुल पटेल म्हणाले की, 'मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे हे मला समजलं पण मूळ प्रॉब्लेम आहे की राज्य निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका काही वार्डातल्या पुढे ढकलल्या आहेत ते काही योग्य नाही. हे चुकीचे आहे. यामुळे निवडणुकीला विलंब होणे हे योग्य नाही.' असे म्हणत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचे सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र जैन यांनी बजावला मतदानाचा हक्क

आज गोंदिया जिल्ह्यात दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गोंदिया नगरपरिषद नगरपरिषद असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र जैन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला गोंदिया शहरातील मनोहर मुन्सिपल शाळेच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत एक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राष्ट्रवादी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी मतदारांना केले.