सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण आणि सावंतवाडी या 2 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
- पहिल्या फेरीत सावंतवाडीत भाजपचे नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले 324 मतांनी आघाडीवर
-----------
1. मालवण
मालवण नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----
मालवण नगर परिषदेसाठी एकूण 74 टक्के मतदान झालं
मालवणमध्ये २० मतदान केंद्रे आणि १४,३८५ मतदार आहेत. सुरक्षित आणि सुरळीत मतदानासाठी येथे ३२ कंट्रोल युनिट व ६४ बॅलेट युनिट्स ठेवण्यात आले आहेत.
- मालवण नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
2. सावंतवाडी
सावंतवाडी नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- पहिल्या फेरीत सावंतवाडीत भाजपचे नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले 324 मतांनी आघाडीवर
-----------
सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
-----
सावंतवाडी नगर परिषदेसाठी एकूण 69 टक्के मतदान झालं
- सावंतवाडी पोलीस ठाण्यातच शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
मतदान संपायला काहीच मिनिटं शिल्लक असताना सावंतवाडी झालेल्या राजकीय राडया नंतरचे पडसाद मतदान संपल्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात उशिरा उमटले आहेत. सेना-भाजपचे कार्यकर्ते सावंतवाडी पोलीस ठाण्यात एकत्र आल्यानंतर येथे जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. पोलीस ठाण्यातच शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तू-तू मै-मै झालेले पाहायला मिळाले. या घटनेनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात वातावरण तंग बनले आहे.
- आपणच निवडून येणार आणि गुलाल उधळणार, दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास
निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आणि रात्री सुद्धा विरोधकांकडून पैशांचे वाटप झाले, अशा तक्रारी आणि माहिती पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार झाल्यामुळे ती गाडी अडवण्यात आली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सावंतवाडी हे शांत शहर आहे आणि ते शांतच राहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
"पैशांनी डोकी विकत घेता येतात, पण लोकांचं प्रेम नाही," असा टोला लगावत, कितीही पैशांचा वापर झाला तरी निकाल आपल्याच बाजूने लागेल, असे त्यांनी म्हटले.
लोकशाहीच्या या उत्सवात आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
सावंतवाडी नगर परिषदेसाठी एकूण 69.36% मतदान झाले
सावंतवाडीत २१ मतदान केंद्रे असून १९,४२९ मतदार नाव नोंद आहेत. निवडणुकीसाठी ३३ कंट्रोल युनिट व ६६ बॅलेट युनिट्स तैनात करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT











