नवी दिल्ली: महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (18 एप्रिल) राष्ट्राला संबोधित करत आहेत. त्यांनी विधेयक संमत न झाल्याबाबत विरोधी पक्षांना जबाबदार धरले. ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी त्यांच्या स्वार्थापोटी हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील महिला शक्ती सर्व काही पाहत आहे आणि विधेयकाच्या पराभवामुळे त्यांना तीव्र दुःख झाले आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान म्हणाले की, महिला शक्तीचा प्रवास थांबला आहे आणि त्यांची स्वप्ने निर्घृणपणे चिरडली गेली आहेत. ते म्हणाले की, सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी ठरले आणि नारी शक्ती वंदन कायद्यात दुरुस्ती होऊ शकली नाही.
महिला आरक्षणाशी संबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. लोकसभेत या विधेयकावर एकूण 528 मते पडली. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला 352 मतांची आवश्यकता होती, परंतु केवळ 298 मते बाजूने पडली. परिणामी, 54 मतांच्या कमतरतेमुळे विधेयक नामंजूर झाले.
विरोधी पक्षांवर आरोप
आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचे परिणाम देशातील महिलांना भोगावे लागले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, महिला आरक्षणाला विरोध करून विरोधी पक्षांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच शिक्षा होईल. ते असेही म्हणाले की, या पक्षांनी संविधानाच्या संस्थापकांच्या भावनांचाही अपमान केला आहे.
हे ही वाचा>> PM मोदी जेव्हा-जेव्हा देशाला संबोधित करतात तेव्हा-तेव्हा... आजही देणार आश्चर्याचा मोठा धक्का?
टाळ्या नव्हे, तर आत्मसन्मानावर हल्ला
पंतप्रधान म्हणाले की, काल देशभरातील लाखो महिला संसद पाहत होत्या. महिला कल्याण प्रस्ताव फेटाळला गेला तेव्हा काही पक्षांचे सदस्य टाळ्या वाजवत होते, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, हे केवळ बाकं वाजवणं नव्हतं, तर महिलांच्या आत्मसन्मानावर आणि स्वाभिमानावर केलेला हल्ला होता.
मोदींनी मागितल देशातील महिलांची माफी
पंतप्रधान म्हणाले की, हा प्रयत्न यशस्वी न झाल्याबद्दल मी देशातील सर्व माता आणि भगिनींची माफी मागतो. त्यांनी पुढे सांगितले की, सरकारसाठी राष्ट्रीय हित सर्वोपरि आहे. परंतु जेव्हा काहींसाठी पक्षाचे हित राष्ट्रीय हितापेक्षा मोठे ठरते, तेव्हा त्याचे परिणाम महिला आणि देश दोघांनाही भोगावे लागतात.
हे ही वाचा>> पंतप्रधान मोदी आज रात्री देशवासियांशी बोलणार, राजकीय वर्तुळात चर्चांना तुफान उधाण.. मोदींच्या मनात नेमकं काय?
महिला खासदारांचा विरोधी पक्षांविरुद्ध निषेध
लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक फेटाळल्यानंतर भाजपच्या महिला खासदारांचा संतापही दिसून आला. त्यांनी संसदेच्या मकर द्वारात विरोधी पक्षांविरुद्ध आंदोलन केले.
शनिवारी, तामिळनाडूमध्ये प्रचार करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारने अद्याप या विधेयकाची आशा सोडलेली नाही. त्यांनी सांगितले की, भाजप-एनडीए हे विधेयक मंजूर करण्यासाठी संयुक्तपणे इतर मार्गांचा शोध घेत आहे.
ADVERTISEMENT











