ज़माना बदल गया है साहब...
अब तख़्त नहीं, स्क्रीन से फैसले होते हैं।
जो दिल तक पहुँचना चाहता है,
उसे पहले मोबाइल की फ्रेम में उतरना पड़ता है।
ADVERTISEMENT
आणि कदाचित म्हणूनच... काल रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेल्फी व्हिडिओच्या मोडमध्ये आले. PM मोदींचा हहा फक्त व्हिडिओ नव्हता तर ते होतं Gen Z च्या भाषेत, Gen Z पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक सेल्फी मोडमध्ये मोबाईल काढतात आणि थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. ना मोठं स्टेज, ना लाल किल्ला, ना टेलिप्रॉम्प्टर.. फक्त मोबाइल, सेल्फी कॅमेरा आणि तीन मिनिटांचा व्हिडिओ.
प्रश्न असा आहे की पंतप्रधान मोदींचा तो व्हिडिओ फक्त पेपर लीकवरचा संदेश होता का? तर तसं अजिबात नाही. ती होती Gen Z पर्यंत पोहोचण्यासाठीची एक नवी राजकीय रणनीती.
मोदींनी Reel शेअर करून काय साधलं?
गेल्या काही आठवड्यांपासून NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांची आंदोलनं, सरकारवर वाढता दबाव विरोधकांचे आरोप आणि जंतर-मंतरपासून सोशल मीडियापर्यंत सुरू असलेली चर्चा याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी काल मध्यरात्री पहिल्यांदाच थेट विद्यार्थ्यांना उद्देशून व्हिडिओ संदेश जारी केला. पण या व्हिडिओची सर्वात मोठी चर्चा झाली ती त्याच्या विषयामुळे नाही तर त्याच्या फॉरमॅटमुळे.
हे ही वाचा>> Inside Story: 'इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहात का?', मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना अचानक विचारलं अन्...
पंतप्रधान मोदींचा हा कोणताही पारंपरिक सरकारी संदेश नव्हता. तर मोदींनी मोबाइल हातात धरून सेल्फी मोडमध्ये शूट केलेला तो एक कॅज्युअल व्हिडिओ होता. जणू एखादा कंटेंट क्रिएटर बोलतोय अशा शैलीत पंतप्रधान मोदी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसले. मोदींनी केलेला हा बदल राजकीय वर्तुळातील अनेकांच्या नजरेत भरला.
Reel शेअर करण्यासाठी मध्यरात्रीची वेळ का निवडली?
आणखी एक गोष्ट... ती म्हणजे या व्हिडिओसाठी निवडलेली वेळ. व्हिडिओ पोस्ट झाला... तो बरोबर रात्री 11 वाजून 52 मिनिटांनी. ही तिच वेळ आहे जेव्हा लाखो तरुण Instagram, YouTube Shorts, X आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सक्रिय असतात. म्हणून अनेक कम्युनिकेशन तज्ज्ञांच्या मते पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ शेअर करण्यासाठी हीच वेळ निवडणं हा काही योगायोग नव्हता तर ती होती एक नियोजित रणनीती.
या व्हिडिओच्या सुरुवातीला मोदींनी आपल्या सुपरिचित आवाजात 'मित्रों... किंवा भाई और बहनो..' अशी हाक नाही मारली. तर जेन झी असलेल्या विद्यार्थ्यांना साद घालण्यासाठी पंतप्रधान थेट म्हणाले, "Friends...'' त्यानंतर ते काही क्षण थांबले अन् मग पुढे म्हणाले 'मला याची जाणीव आहे की, पेपर लीक ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोषींना अटक झाली असून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे.'
हे ही वाचा>> Gen Z चा विषय लय हार्डए! आता 'या पोरांची' तर सरकारलाही धास्ती!
'विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारने विक्रमी वेगाने परीक्षा घेतल्या आणि सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आणि आता पेपर लीकविरोधात आणखी कठोर कायदा आणण्याची तयारी सुरू आहे.'
यावेळी पंतप्रधानांनी असंही सांगितलं की, फास्ट-ट्रॅक कोर्ट तयार करण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा होणार आहे आणि शक्य तितक्या लवकर संसदेत विधेयक आणण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच मोदींचा संपूर्ण व्हिडिओ मेसेज हा फक्त सहानुभूतीचा नव्हे तर कृतीचं आश्वासन देण्याचाही होता.
पण या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट विशेष जाणवली. ती म्हणजे पंतप्रधान मोदी हे सामान्यतः राजकीय भाषणांमध्ये विरोधकांवर टीका करतात. एकीकडे हा विषय एवढा चिघळलेला असतानाही मोदींनी आपल्या व्हिडिओमध्ये मात्र तसं काहीच केलं नाही.
Gen Z साठी मोदींचा नवा फंडा
ना राजकीय हल्ले, ना आरोप-प्रत्यारोप.. यावेळी त्यांचा संपूर्ण भर होता तो विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भविष्याबाबत.
दरम्यान, मोदींच्या या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोट्यवधी व्ह्यूज, लाखो प्रतिक्रिया.. तसंच अनेकांनी या नव्या फंड्याचं स्वागतही केलं. मात्र, काहींनी प्रश्नही उपस्थित केले. शिक्षणमंत्र्यांबाबत थेट भाष्य का केलं नाही? पत्रकार परिषद का घेतली नाही? असे एका ना अनेक सवाल सोशल मीडियावर विचारले गेले.
पण हे सगळं असलं तरी राजकारणात संदेश हा महत्त्वाचा असतो. मात्र, आजच्या काळात तर मेसेजपेक्षा त्याचं पॅकेजिंग अधिक महत्त्वाचं ठरतं. खरं तर Gen Z ला मोठी भाषणं नको असतात. त्यांना हवी असते थेट, छोटी आणि मोबाइलवर पाहता येणारे व्हिडिओ किंवा रिल्स.
म्हणूनच मोदींचा सेल्फी व्हिडिओ हा केवळ तीन मिनिटांचाच होता. पण त्या तीन मिनिटांत सरकारने केवळ पेपर लीकवर भूमिका मांडली नाही तर Gen Z शी संवाद साधण्याची नवी पद्धतही दाखवून दिली.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मोदींचा हा सेल्फी व्हिडिओ विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा जिंकू शकेल का? की विद्यार्थ्यांना आता व्हिडिओ नव्हे तर प्रत्यक्ष निकाल हवा आहे?
ADVERTISEMENT












