Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

मुंबई तक

24 Jul 2026 (अपडेटेड: 24 Jul 2026, 11:26 AM)

jantar mantar student protest : जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचं कव्हरेज करताना मुंबई Takच्या प्रतिनिधीला काही आंदोलकांनी घेरलं आणि घोषणाबाजी केली. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली आणि संबंधितांनी नंतर माफीही मागितली.

Jantar Mantar CJP Protest

Jantar Mantar CJP Protest

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Jantar Mantar वर CJP चं विद्यार्थी आंदोलन कव्हर करणाऱ्या मंबई Tak प्रतिनिधीसोबत काय घडलं?

jantar mantar student protest : नवी दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 25 दिवसांहून अधिक काळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज, मारहाण, अश्रूधुराचे नळकांडे आणि आंदोलकांसोबत झटापटी झाल्याच्या घटना घडल्या. या घडामोडीनंतरही जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच असून दररोज हजारो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होत आहेत. मुंबई Takकडून या आंदोलनाचं सातत्याने कव्हरेज करण्यात येत असून गुरुवारीही प्रतिनिधी अनुजा धाक्रस आंदोलनस्थळी उपस्थित होत्या.

हे वाचलं का?

हेही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!

माध्यमांविरोधात घोषणाबाजी सुरू करत घेरण्याचा प्रयत्न

आंदोलनाचं कव्हरेज सुरू असताना अनुजा धाक्रस काही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेल्या. त्यावेळी काही जणांनी माध्यमांविरोधात घोषणाबाजी सुरू केली आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अनुजा धाक्रस यांनी आपण प्रश्न विचारण्यासाठी आल्याचं वारंवार सांगत आंदोलकांना आधी प्रश्न ऐकून घेण्याची विनंती केली. पत्रकार म्हणून आपलं काम प्रश्न विचारणं आणि दोन्ही बाजू मांडणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच एखाद्या पत्रकाराला प्रश्न न ऐकता घेरणं किंवा त्याच्यावर नाराजी व्यक्त करणं योग्य नसल्याचंही त्यांनी आंदोलकांच्या निदर्शनास आणून दिलं.

हेही वाचा : Sonam Wangchuk यांनी उपोषण सोडलं पण अभिजीत दिपकेंचा प्रचंड मोठा निर्णय, सगळं राजकारणच पलटलं!

आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन

या गोंधळादरम्यान महाराष्ट्रातील काही विद्यार्थी पुढे आले आणि त्यांनी इतर आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी उपस्थितांना अनुजा धाक्रस यांचं म्हणणं ऐकून घेण्यास सांगितलं. त्यानंतर संबंधित आंदोलकांनी वातावरण शांत करत आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलनामुळे अनेक विद्यार्थी संतप्त असल्याने क्षणभर गैरसमज निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रश्न पूर्ण ऐकून न घेताच प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच एका महिला पत्रकाराला अशा प्रकारे घेरणं योग्य नसल्याचं मान्य करत माफी मागितली. भविष्यात कोणतीही महिला पत्रकार किंवा पत्रकार आपलं काम करण्यासाठी आला तर त्याला शांतपणे प्रश्न विचारू द्यावेत, उत्तर द्यायचं असेल तर द्यावं आणि नसेल तर निघून जावं, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

यानंतर अनुजा धाक्रस यांनीही आपलं काम केवळ दोन्ही बाजू लोकांसमोर मांडण्याचं असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि आंदोलकांची भूमिका या सर्व बाबी वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला घोषणाबाजी आणि विरोध झाल्यानंतर संवादातून परिस्थिती निवळली आणि संबंधितांनी माफी मागितली. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान घडलेला हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाला असून पत्रकारांना प्रश्न विचारण्याचं आणि आपलं काम करण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहणं आवश्यक असल्याचा मुद्दाही या घटनेतून समोर आला.