‘4 वर्षात 2 डझन आमदार झाले, पण मी पात्र नाही…’, पंकजा मुंडे आता खेळणार मोठा डाव

मुंबई तक

03 Jun 2023 (अपडेटेड: 03 Jun 2023, 03:03 PM)

Politics in Maharashtra: कोणतंही महत्त्वाचं पद न मिळाल्याने नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनी आपली नाराजी स्पष्टपणे जाहीर केली. याचबाबत त्या अमित शाह यांना भेटणार आहेत. त्या बीडमध्ये बोलत होत्या.

gopinath munde death anniversary pankaja munde bjp mla mp amit shah devendra fadnavis beed maharashtra politics

gopinath munde death anniversary pankaja munde bjp mla mp amit shah devendra fadnavis beed maharashtra politics

follow google news

Maharashtra Politics: बीड: भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मनातील खदखद आज (3 जून) पुन्हा एकदा जाहीरपणे समोर आली आहे. ‘गेल्या चार वर्षात दोन डझन आमदार-खासदार झाले. गेल्या चार वर्षात त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणारच… त्यामुळे मी आता अमित शाहांना (Amit Shah) भेटणार आहे.’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपण यापुढेही आक्रमक पद्धतीनेच राजकारण करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीडमध्ये (Beed) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (gopinath munde death anniversary pankaja munde bjp mla mp amit shah devendra fadnavis beed)

हे वाचलं का?

यावेळी पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे म्हटलं की, ‘मी अमित शाह यांना भेटून विचारणा करणार आहेत की, माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे? याची स्पष्टता मला द्या.’ याचाच अर्थ पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा त्यांचे पक्षातील विरोधक समजले जाणारे देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने राजकीय डावपेचाला या निमित्ताने सुरुवात होईल हेही निश्चित.

‘चार वर्षात दोन डझन आमदार-खासदार झाले, मी अमित शाहांना भेटणार’

‘मी काहीही बोलले की, मीडियात नंतर पोस्टमार्टम… पण मी त्यांना दोष देत नाहीए. दोष त्यांचा नाही.. परिस्थिती जी झालीए त्याचा दोष आहे. कारण गेल्या पाच वर्षात ज्या राजकीय भूमिका प्रत्येक पक्षाने घेतल्या आहेत… माझ्या पक्षासकट त्यामुळे प्रत्येक वाक्य हे कुणाला ना कुणाला लागू पडतंय.’

‘भूमिका या समाजहिताच्या घ्यायच्या असतात.. कोणाला आवडेल त्या भूमिका घेणाऱ्या व्यक्ती एखाद्या वेळी आमदारकी, खासदारकी, राज्यमंत्री आणि मंत्रिपद मिळवू शकतो. पण तो नेता होऊ शकत नाही. मला हे मिळालयं का..? मला तर परळीतून पराभव स्वीकारायला लावला..’

‘मला जर भूमिका घ्यायची असेल तर पत्रकारांना बोलवेल आणि तुमच्या समोर बिनधास्त माझी भूमिका मांडेल. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालवणारे खांदे अजून तरी मला मिळालेले नाहीत. मात्र, माझ्या खांद्याची रूंदी एवढी आहे की अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना मी विसावू देणार नाही. पंकजा जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल.’

हे ही वाचा >> Maharashtra Politics: ‘धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं..’, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका

‘अनेक लोकं निवडणुका हरले.. तरी त्यांना संधी दिली. कदाचित दोन डझन आमदार-खासदार झाले आहेत. गेल्या चार वर्षात त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार… ही चर्चा मी ओढावली नाही. पण माझ्या मनात गाढ विश्वास आहे. माझे नेते आहेत अमित शाह.. मी त्यांची भेट घेणार आहे. वेळ मागितला.. त्यांच्याशी मी मनमोकळं बोलणार.. त्यांना विचारणार..’ असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

‘मी थेट विचारणार, माझ्याबाबत तुमच्या मनात काय आहे?’

‘माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती मला सापडला आहे. त्यांच्याशी मी बोलणार.. हितचिंतक खूपच आहेत. रडगाणं गाणारी नाही. बाप मेला तरी मी डोळ्यात अश्रू येऊ दिले नाही. मी शपथ खाल्लेली आहे.. मला आज तुमच्यासमोर स्पष्टपणे सांगायचं आहे. तुमचं प्रेम, तुमची दिशा हेच माझं राजकारण ठरवणार..’

‘मी माझ्या बरोबरीने काम करणाऱ्यांकडून काय अपेक्षा करू. माझी त्यांच्याकडून अपेक्षा नाही. अपेक्षा आहे ती तुमच्याकडून. तुम्ही विश्वास ठेवा.. तुम्ही कुठल्याही गोष्टीत व्यथित होऊ नका.’

‘माझ्याबाबत ज्या चर्चा सुरू असतात त्याबाबत माझे सहकारी विनोद तावडे यांनी योग्य उत्तर दिलं आहे. इतरांनी देखील सन्मानजनक उत्तरं दिली आहेत. मी एवढंच सांगते.. मी कशाच्या आडून माझ्या भूमिका घेते हा स्वभाव नाही.’

‘मी माझ्या नेत्यांशी संवाद साधणार आहे. या सगळ्या घटनांबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना विचारणार आहे की, माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे? ती स्पष्टता माझ्या लोकांना आल्याशिवाय मला विश्वास देता येणार नाही.’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली पुढची राजकीय चाल काय असणार हे उघड करून टाकलं आहे.

पंकजा मुंडेंचा फडणवीसांना थेट इशारा?

‘मी 19 वर्षापासून राजकारणात आहे. पण गेल्या 5 वर्षात मला खूप अनोखे अनुभव आले आहेत. मी बोलायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनात सतत शंका वाटली की, माझ्या बोलण्याचे काय अर्थ निघतील. तर गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण करू शकणार नाही.’

हे ही वाचा >> Crime: बॅगेत सापडली मुंडकं नसलेली महिला.., टॅटूमुळे सापडले नराधम मारेकरी

‘ज्या दिवशी मी समोरच्या माणसाला जे आवडेल ते बोलणार नाही त्यादिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभं राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आज मीडिया माझ्या मागे आहे.’

‘माझे शब्द ठाम आहेत.. आयुष्यात कधीही सत्तेच स्वप्न बघू शकत नाही अशा पक्षात जाऊन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. त्या पक्षाला सत्तेच्या शिखरापर्यंत पोहचविण्यात त्यांचा वाटा होता. त्या गोपीनाथ मुंडेंची मी कन्या आहे.’

‘जर आपण मुंडे साहेबांचं स्मरण केलं तर आपल्याला एक वाक्य नेहमी आठवेल.. ते म्हणजे मी थकणार नाही.. मी थांबणार नाही.. मी कोणासमोरही कधी झुकणार नाही.. मुंडे साहेब हे वाक्य तुमच्यासाठी उच्चारत होते. ते कुणाला धमकवण्यासाठी, इशारा देण्यासाठी बोलत नव्हते. ज्याला इशारा मिळायचा त्याला मिळतच असतो.’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

    follow whatsapp