Hemant Patil on Ashok Chavan, नांदेड : भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी सनसनाटी आरोप केलेत. नांदेडमधील महापालिकेची शाळा आणि भाजी मार्केटची जागा ओबीटी तत्वावर देऊन अशोक चव्हाण यांनी विकून टाकल्या. शिवाय नांदेडमधील अनेक जागा त्यांनी सत्तेच्या जोरावर बळकावल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. शिवाय याबाबत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नांदेडमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
नांदेडच्या जनतेला कधी जाग येणार नाही?
हेमंत पाटील म्हणाले, नांदेड शहरातील कुस्त्याच्या मैदानावर शॉपिंग कॉम्प्लेक्स झालंय. जिथे गोर-गरिब माणसं भाजी विकायला बसायचे, अशा महात्मा फुले भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते नामशेष केले. तिथे सोन्याचे दुकानं झाले आहेत. त्याच्यामुळे चालायचंही अवघड झालंय. कलामंदिरात बालगंधर्वांपासून मोठी मंडळी येऊन गेली. ते कलामंदिर संपवून टाकण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदच्या जागेवर अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. तीन एकरचा भुखंड त्यांना बळकवायचा आहे. आता त्यांना जिल्हा परिषदेची इमारत बीओटीवर द्यायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ताब्यात घ्यायच्या आणि बीओटीवर करुन कागदात बसवून. मोठ्या प्रमाणात पैसा कमवायचा. हे या लोकांचं सूत्र आहे. नांदेडच्या जनतेला कधी जाग येणार नाही? काही माहिती नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही यामध्ये लढत आहोत.
अशोक चव्हाणांच्या जमीन घोटाळ्याबाबत विधानसभेत आवाज उठवणार
पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले, नांदेडमधील वापराच्या जागा लोकांना विकायच्या त्यानंतर आजुबाजूंच्या खेड्यातील लोकांवर आरक्षण टाकण्याचा प्रकार सुरु आहे. कवठा परिसरातील जवळपास 40 एकर जमीन मातीमोल जमीन मातीमोल भावाने घेतली. तिथे कोर्ट उभं केलं. त्यातून शेकडो कोटी रुपये कमी केले. याची चौकशी व्हायला हवी. हा फार मोठा घोटाळा आहे. परंतु चौकशी लागली की सत्तेत येऊन बसतात. हे येथील राजकारण्यांचं सूत्र आहे. याची कधी चौकशी लागणार आणि कधी सत्य बाहेर येणार माहिती नाही. मात्र, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. नांदेडमधील जागा माहेश्वरी बिल्डर वगैरे घेत आहेत. शेकडो कोटी रुपये कमावतात. याबाबत आम्ही कधीच शांत बसणार नाही. रस्त्यावरुन उतरुन आम्ही याबाबत लढा देऊ. या जिल्ह्याची सूत्र गेल्या 70 वर्षांपासून चव्हाण कुटुंबियांकडेच आहेत. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत प्रश्न मांडला जाईल. याबाबत चुकीचे काम करणाऱ्यांना आयुक्तांना देखील घरी पाठवलं जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











