आकाश, MRSAM ते शिल्का... पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर, भारताची ढाल ठरलेत हे 5 एअर डिफेन्स शस्त्र

पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड आणि इतर 15 शहरांमधील भारतीय सैन्याच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ते सगळेच हल्ले या यंत्रणांनी परतवून लावले.

Mumbai Tak

मुंबई तक

09 May 2025 (अपडेटेड: 09 May 2025, 08:12 AM)

follow google news

Indias Air Defence System : भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, 8 मे 2025 रोजी पाकिस्तानने भारतातील 15 शहरांमधील भारतीय सैन्याच्या छावण्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र, पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी पूर्णपणे हाणून पाडला. भारतीय सैन्याच्या आकाश, MRSAM, झू-23, एल-70 आणि शिल्का यासारख्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

हे वाचलं का?

या प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण धोरणाचा अविभाज्य भाग आहेत. शत्रूच्या हवाई धोक्यांना नष्ट करण्यास सक्षम आहेत. 7-8 मे 2025 च्या रात्री, पाकिस्तानने श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड आणि इतर 15 शहरांमधील भारतीय सैन्याच्या तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. ते सगळेच हल्ले या यंत्रणांनी परतवून लावले.

हे ही वाचा >> मोठी बातमी... भारतीय Navy ने केलं कराची बंदर उद्ध्वस्त, पाकिस्तानवर समुद्री हल्ला

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर हा हल्ला झाला. यामध्ये 26 नागरिक ठार झाले. ऑपरेशन सिंदूर-1 मध्ये, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

भारताच्या काउंटर-यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणाली, ज्यामध्ये आकाश, एमआरएसएएम, झू-23, एल-70 आणि शिल्का आहेत. या यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ल्यांना निष्क्रिय केलं. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रणालींनी पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. यामुळे भारताचं कोणतंही नुकसान झालं नाही. 

1. आकाश क्षेपणास्त्र 

आकाश ही डीआरडीओने डिझाइन केलेली स्वदेशी विकसित मध्यम-श्रेणीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ती भारतीय लष्कर आणि हवाई दलाचा कणा आहे.

वैशिष्ट्ये

  • रेंज: 25-30 किलोमीटर
  • लक्ष्य: लढाऊ विमाने, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे
  • उंची: 18 किलोमीटरपर्यंत
  • मार्गदर्शन प्रणाली: रडार-आधारित कमांड
  • अचूकता: 90% पेक्षा जास्त
  • मोबाइल लाँचरच्या माध्यमातून हे लाँच केले जाते.

आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने श्रीनगरकडे जाणारे पाकिस्तानी जेएफ-17 जेट उद्ध्वस्त केलं. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यात आणि नष्ट करण्यात या प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली.
 

2. MRSAM(मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र)


MRSAM ही भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त सहकार्यानं विकसित केलेली एक प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे. ती बराक-8 क्षेपणास्त्राचा भाग आहे आणि भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात तैनात केली जाते.

वैशिष्ट्ये

  • रेंज: 70-100 किलोमीटर
  • लक्ष्य: लढाऊ विमाने, ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे
  • उंची: 20 किलोमीटर पर्यंत
  • मार्गदर्शन प्रणाली: सक्रिय रडार होमिंग आणि मल्टी-फंक्शन रडार
  • अचूकता: उच्च अचूकतेसह मल्टी-टार्गेट ट्रॅकिंग
  • मोबाइल लाँचिंग आणि नौदल प्लॅटफॉर्मवरुन लाँच केलं जाऊ शकतं. 

सध्याची कामगिरी : MRSAM ने उत्तर आणि पश्चिम भारतात पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या लांब पल्ल्याच्या आणि मल्टी-टार्गेट ट्रॅकिंगमुळे ते प्रभावीपणे काम करतं.

3. ZU-23-2

झू-23-2 ही सोव्हिएत-निर्मित ट्विन-बॅरल 23 मिमी स्वयंचलित तोफा आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. विमानांना टार्गेट करण्यासाठी वापरली जाते.

वैशिष्ट्ये

  • रेंज: 2.5 किमी
  • लक्ष्य: कमी उंचीवर उडणारे ड्रोन, हेलिकॉप्टर आणि विमान
  • वेग: 970 मिटर/सेकंद
  • मार्गदर्शन प्रणाली: ऑप्टिकल आणि रडार-आधारित ट्रॅकिंग
  • मोबाइल लाँचिंग किंवा फिक्स पॉइंटवरुन लाँच केलं जातं. 
  • सध्याची कामगिरी : झू-23-2 ने उधमपूर आणि इतर भागात कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. 

4. L-70

L-70 ही स्वीडिश-निर्मित 40 मिमी विमानविरोधी तोफा आहे. भारताने अपग्रेड केली ही तोफ आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षणाचा भाग आहे.

वैशिष्ट्ये

  • रेंज: 4 किलोमीटर
  • लक्ष्य: ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणारी विमाने
  • वेग: प्रति मिनिट 300 राउंड
  • मार्गदर्शन प्रणाली: रडार-आधारित अग्नि नियंत्रण प्रणाली
  • फिक्स पॉइंटवरुन किंवा मोबाईल लोकेशनवरुन मारा केला जाऊ शकतो. 
  • सध्याची कामगिरी : विशेषतः पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशात L-70 ने पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अचूकता आणि फास्ट फायरींगमुळे ते महत्वाचं ठरलं. 

5. शिल्का (ZSU-23-4)

शिल्का ही सोव्हिएत-निर्मित स्वयंचालित विमानविरोधी तोफा आहे. ज्यामध्ये चार 23 मिमीची तोफ आहे. ती भारतीय सैन्याच्या कमी उंचीच्या संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

वैशिष्ट्ये

  • रेंज: 2.5 किलोमीटर
  • लक्ष्य: ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी अंतरावर उडणारी विमाने
  • वेग: 4000 राउंड प्रति मिनिट
  • मार्गदर्शन प्रणाली: रडार आणि ऑप्टिकल ट्रॅकिंग
  • वाहनांवर लाँच केलं जाऊ शकतं. 
  • सध्याची कामगिरी: शिल्काच्या उच्च फायरिंग रेटमुळे उधमपूर आणि इतर भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात मदत झाली. त्याची कुशलता आणि रडार-आधारित ट्रॅकिंगमुळे ते युद्धभूमीत प्रभावी ठरलं.

पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडण्यात भूमिका

पाकिस्तानी सैन्याने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या भागातील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या मते, एकात्मिक काउंटर-यूएएस ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे हल्ले परतवून लावण्यात आले.

 

    follow whatsapp