'महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलाने... ', पार्थ पवारांवर काँग्रेस चिडली! बरंच काही बोलले!

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. त्याच टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने आता प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा काँग्रेसने नेमकं काय केलंय ट्वीट.

baramati, congress, ncp, parth pawar, Jay Pawar, Parth Pawar wife name, Parth Pawar wife photo, Is Parth Pawar married, Parth Pawar property, Parth Pawar son, Parth Pawar wikipedia, Parth Pawar age

parth pawar

मुंबई तक

• 11:33 PM • 06 Apr 2026

follow google news

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर आता काँग्रेसकडून देखील पार्थ पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (INCMaharashtra) प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये पार्थ पवार यांच्या ‘काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल’बद्दलच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसने पार्थ पवार यांना ‘धड भाषणही देता न येणारे’, ‘कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर नुकतेच खासदार झालेले’ आणि ‘कृतघ्न मुलगा’ म्हणत त्यांच्यावर व्यक्तिगत आणि राजकीय स्तरावर हल्ला चढवला आहे. 

हे वाचलं का?

काँग्रेसकडून पार्थ पवारांवर जोरदार हल्ला, नेमकं ट्वीट काय?

'धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं?'

'स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.'

हे ही वाचा>> सूनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण आहेत?

'या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?' अशा स्वरुपाचं ट्वीट करत काँग्रेसने पार्थ पवारांना लक्ष्य केलं.

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा

दरम्या,न या ट्विटमध्ये अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूचा (बारामती अपघात/प्लेन क्रॅश) मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. काँग्रेसने यावेळी असंही म्हटलं की, 'वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने (जिथे काँग्रेसचे सरकार आहे) त्यांच्या राज्यात FIR नोंद केली आहे. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार याच संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करण्याची मागणी करत आहेत. उमेदवाराने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र सरकारने FIR नोंद केली नाही तर ते निवडणुकीतून माघार घेतील. “यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?” असा टोला काँग्रेसने पार्थ पवारांना लगावला आहे.

हे ही वाचा>> रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी CDR ची कॉपी काढली; सनसनाटी आरोप

पार्थ पवार काँग्रेसबाबत नेमकं काय म्हणालेले?

“माझं कोणाशीही बोलणं झालं नाही. पण त्यांनाच कळायला पाहिजे काय करायचं काय नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत? सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करू द्या. त्यांना नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे”

सध्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक सुरू असून, काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. त्यावरून आता नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.