Fadnavis On Uddhav Thackeray Meeting : 'उद्धव ठाकरेंना मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघडपणेही केली जाऊ शकते' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित गोदा ते नर्मदा या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री भेट झाल्याचं ट्विट व्हायरल झालं होतं. त्यानंतर राज्यभरात याची चर्चा रंगली होती.
ADVERTISEMENT
'लपवायची आवश्यकता नाही..'
उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्याचा दावा फडणवीसांनी फेटाळून लावला आहे. फडणवीस म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंना मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही. ती उघडपणेही केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आता आमच्यात नाहीत की ते लपवायची त्याठिकाणी आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल.'
हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..
काय आहे प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचा दावा?
प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसने 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5.59 वाजता एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये सूत्रांचा हवाला देत असं म्हटलंय की, 'उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री सुमारे 2 वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भेट दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.' यानंतर राजकीय विश्व ढवळून निघालं होतं. याविषयी पत्रकारांनी आज फडणवीसांना प्रश्न विचारला. मात्र फडणवीसांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे सांगितले.
हे ही वाचा : उल्हासनगर : विरोधी पक्षनेता निवडीवरुन भाजप नगरसेवकांचा राडा, महापालिकेत शिवसेना–भाजप युती तुटण्याच्या मार्गावर?
बागेश्वर बाबांच्या विधानाविषयी..
यावेळी फडणीसांना बागेश्वर बाबा यांच्या नागपूरमधील कार्यक्रमातील वक्तव्यांबाबतही विचारण्यात आले. नागपूरमधील एका कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी चार मुलं जन्माला घालून एक मूल संघासाठी समर्पित करावं असं वक्तव्य केलं होतं. त्यावर फडणवीस म्हणाले की, 'साधू-संत त्यांची मतं मांडत असतात. त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे. मुळात त्यांच्या म्हणण्याचा असा उद्देश होता की, संघ एक अशी संघटना आहे जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्याठिकाणी जीवंत ठेवलंय, नवचैतन्य दिलंय. त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा संघात असावा.'
ADVERTISEMENT











