MTON 2024 VIDEO: PM मोदींना हलक्यात घेणं काँग्रेसला पडतंय महाग, महाराष्ट्रात काय होणार?

मुंबई तक

• 02:52 PM • 08 Feb 2024

Mood of the Nation 2024 Live: देशाचा नेमका मूड काय हे आम्ही Mood of the Nation मधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा देशाला भाजप आणि काँग्रेसबाबत नेमकं काय वाटतं.

काय आहे देशाचा मूड

Mood of the nation 2024

follow google news

Mood of the Nation 2024: मुंबई: लोकसभा 2024 निवडणुकीला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्याआधी देशाचा नेमका मूड काय आहे हे इंडिया टुडे आणि मुंबई Tak ने मूड ऑफ द नेशन (Mood of the Nation) या सर्व्हेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याच सर्व्हेमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची उत्तर भारतात लाट असल्याचं दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असणार हे आपल्या थोड्याच वेळात समजणार आहे. (mood of the nation 2024 taking pm modi lightly is costing congress what will happen in maharashtra) 

हे वाचलं का?

काही महिन्यांपूर्वीच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या उत्तरेकडील राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत जे निकाल होते ते अत्यंत अनपेक्षित असे होते. त्यातही मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळेल अशी आशा होती. मात्र, तसं अजिबात घडलं नाही.

लोकसभेसाठी भाजपची काँग्रेसला एकटं पाडण्याची खेळी?

लोकसभेची निवडणुकीत फक्त मुद्दे नाही तर नेते, चेहरा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ज्या पद्धतीने इंडिया आघाडीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर भाजपने जी पावलं उचलली.. त्यानंतर भाजपने समविचारी मतांमध्ये विभाजन कसं होईल याची काळजी घेतली. यावेळी भाजपने एक साधी आणि सरळ अशी रणनिती आखल्याचं यावेळी दिसून येत आहे. ज्यानुसार काँग्रेसला एकटं पाडून त्यांनी एकट्याने लोकसभेची निवडणूक लढवावी. असा भाजपचा प्रयत्न आहे.

हे ही वाचा >> MOTN 2024 : मोठा कौल! भाजप की काँग्रेस कुणाला धक्का?

निवडणुकींच्या बाबतीत काँग्रेसचा काहीसा ढिलेपणा ही त्यांची सर्वात मोठी कमकुवत बाजू दिसून येत आहे.  225 जागा या उत्तरेत आहेत. त्यापैकी 185 जागा या भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे या पट्ट्यातील जागा वाढविण्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपचा प्रयत्न असणार आहे. 

तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात भाजपने 2014 पासूनच सुरुवात केली होती. त्यामुळे भाजप अपडेटेड राजकारण करताना पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र आऊटडेटेड राजकारण करत असल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत आहे.

भाजपचं आक्रमक राजकारण

यावेळी भाजप हरेल आणि आपण पुन्हा सत्तेत येऊ हा काँग्रेसचा जो समज होता तोच त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. पण भाजपने अत्यंत आक्रमक असं राजकारण केलं. काँग्रेसने हे समजून घ्यायला हवं होतं की, मोदी हे सत्तेच्या राजकारणात किती वेळ थांबण्यासाठी आले आहेत. 

हे ही वाचा >> Mood Of The Nation Live : 'एनडीए' की 'इंडिया', कुणाची सत्ता येणार?

ज्या नरेंद्र मोदींनी सलग 15 वर्षांहून अधिक काळ गुजरातची सत्ता राखली.. त्या मोदींना काँग्रेसने अत्यंत हलक्यात घेतलं. त्यांना दिल्ली आणि उत्तरेतील राजकारण जमणार नाही असा काँग्रेसचा समज होता. पण त्यांचा हा समज पूर्णपणे खोटा ठरवत मोदींनी एका मुठीत देश काबीज केला. 

हे यश मोदींनी सलग 24 तास राजकारण करण्याच्या वृत्तीतून मिळवली आहे. त्यात त्यांनी अजिबात कसर सोडली नाही. 

त्यामुळेच आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  काँग्रेससाठी हा मोठा अलर्ट आहे. कारण जर यापुढेही काँग्रेसने निवडणूक लढविण्याची आपली पारंपारिक पद्धत कायम ठेवली तर मात्र, त्याचा थेट फायदा हा भाजपला होऊ शकतो. 

    follow whatsapp