MOTN 2024 : मोदींची लाट, काँग्रेस साफ; आज निवडणूक झाल्यास कुणाला किती जागा?
MOTN : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी किती जागा भाजपला मिळणार, काँग्रेसची कामगिरी काय असेल?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मूड ऑफ द नेशनमध्ये उत्तर प्रदेशचा कौल कुणाला?

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकी कुणाला किती जागा?

उत्तर प्रदेशातील ८० पैकी भाजपला किती जागा मिळू शकतात?
Mood of The Nation Uttar Pradesh opinion poll 2024 Lok Sabha 2024 Election : असं म्हणतात दिल्लीतील केंद्रीय सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे ज्या पक्षाला दिल्लीतील सत्ता हवी असेल, त्यांना उत्तर प्रदेशचा पाठिंबा असायला हवा. आता लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर प्रदेशातील मतदारांचा मूड काय आहे, याबद्दल काही निष्कर्ष समोर आले आहेत. इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन'च्या पोलमधून उत्तर प्रदेशचा कौल कुणाच्या बाजूने आहे, याबद्दल महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने देशातील वातावरण कुणासाठी पोषक आहे, याचा धांडोळा घेणारं सर्वेक्षण इंडिया टुडे-सी व्होटरने केलं आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात जाऊन 1,49092 लोकांचे सर्वेक्षण करून निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण 15 डिसेंबर ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील जनतेचा कल काय?
2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणामध्ये उत्तर प्रदेशचा कौल भाजपच्या दिशेने दिसत आहे. आज लोकसभा निवडणूक झाल्यास उत्तर प्रदेशात मोदी लाट दिसत आहे.
उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी वाढणार
मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदारसंघात भाजपला 52.1 टक्के मते मिळवू शकतात. दुसरीकडे काँग्रेसला 5.5 टक्के, तर समाजवादी पार्टी 30.1 टक्के, बसपा 8.4 टक्के आणि इतरांना 3.9 टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज आहे.