नगर परिषद निवडणूक: उद्या नाही निवडता येणार तुमचा नगरसेवक, 'या' वॉर्डातील मतदान लांबणीवर.. पाहा संपूर्ण यादी!

महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील एकूण 154 सदस्य पदांसाठीची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. पाहा कोणकोणत्या वॉर्डातील सदस्यांची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे.

municipal council election your corporator will not be elected tomorrow voting in 154 wards has been postponed See the complete list

नगर परिषद निवडणूक

मुंबई तक

• 10:06 PM • 01 Dec 2025

follow google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काल (30 नोव्हेंबर) अचानक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील एकूण 154 सदस्य पदांसाठी 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे. हा निर्णय न्यायालयीन अपील आणि प्रभाग रचना विवादांमुळे घेण्यात आला असून, यामुळे 24 नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीवर थेट परिणाम झाला आहे.

हे वाचलं का?

2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान

आयोगाने कायद्याचे पालन करत सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे मूळतः 2 डिसेंबरला होणाऱ्या 154 सदस्य पदांच्या निवडणुका आता 20 डिसेंबरला होणार असून, निकाल 21 डिसेंबरला जाहीर होईल.

हे ही वाचा>> उद्या 'या' नगर परिषदांमध्ये होणार नाही मतदान, तुमची नगरपालिका आहे का 'या' यादीत?

या प्रक्रियेत 10 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. उर्वरित नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सदस्यांचा निवडणुका मात्र 2 डिसेंबरलाच होतील. ज्यात सदस्य आणि नगराध्यक्ष पदांसाठी मतदान होईल. राज्यातील एकूण 3820 प्रभागांपैकी या 154 पदांना स्थगिती लागू आहे.

'या' जिल्हातील नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील सदस्यांच्या निवडणुका ढकलल्या पुढे!

पुणे जिल्ह्यातील एकूण 10 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • दौंड- 9 अ - (1 जागा) 
  • लोणावळा - 5 ब, 10 अ - (2 जागा), 
  • तळेगाव - 2 अ, 7 अ, 7 ब, 8 अ, 8 ब, 10 ब - (6 जागा) 
  • सासवड - 1 जागा 

सातारा जिल्ह्यातील एकूण 3 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • कराड - 15 ब - (1 जागा) 
  • मलकापूर - 4 अ,  8 अ - (2 जागा) 

सांगली जिल्ह्यातील एकूण एका जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली

  • शिराळा - प्रभाग 4

कोल्हापूर जिल्ह्यातील एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली 

  • गडहिंग्लज - 1 जागा

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 8 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • सांगोला - 1  अ, 11 अ - (2 जागा) 
  • मोहोळ - 2 जागा
  • पंढरपूर - 2 जागा
  • बार्शी - 1 जागा
  • मैंदर्गी - 1 जागा

यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 6 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • दिग्रस- 2 ब, 5 ब, 10 ब - (3 जागा) 
  • पांढरकवडा - 8 अ, 11  ब - (2 जागा)
  • वणी - 14 अ - (1 जागा) 

वाशिम जिल्ह्यातील एकूण 2 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • रिसोड - 5 ब, 10 अ - (2 जागा)

गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 4 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • गडचिरोली- 1 अ, 4 ब, 11 ब - (3 जागा) 
  • आरमोरी - प्रभाग 10

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 4 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • गडचांदूर -  8 ब - (1 जागा)
  • मूल - 10 ब - (1 जागा) 
  • बल्लारपूर - 9 अ - (1 जागा) 
  • वरोरा- 7 ब - (1 जागा)

गोंदिया जिल्ह्यातील एकूण 4 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • गोंदिया - 3 ब, 11 ब, 16 अ - (3 जागा)
  • तिरोडा - 1 जागा

भंडारा जिल्ह्यातील एकूण 2 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • भंडारा - 15 अ, 12 अ - (2 जागा)

नागपूर जिल्ह्यातील एकूण 9 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • कोंढाळी - प्रभाग 8, 16 - (2 जागा)
  • कामठी - 10 अ,  11 ब, 17 ब - (3 जागा) 
  • रामटेक - 6 अ - (1 जागा)
  • नरखेड -  2 ब, 5 ब, 7 अ - (3 जागा)

वर्धा जिल्ह्यातील एकूण 7 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • वर्धा - 9 ब, 19 ब - (2 जागा)
  • हिंगणघाट - 5 अ, 5 ब, 9 अ - (3 जागा)
  • पुलगाव - 2 अ, 5 अ - (2 जागा)

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 9 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • खामगाव - 5 अ, 7 अ, 9 ब, 16 ब - (4 जागा) 
  • शेगाव- 4 अ, 4 ब - (2 जागा)
  • जळगाव जामोद - 6 अ, 6 ब, 7 ब - (3 जागा) 

जळगाव जिल्ह्यातील एकूण 12 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या 

  • अमळनेर - 1 अ - (1 जागा)
  • सावदा -  2 ब, 4 ब, 10 ब - (3 जागा)
  • यावल - 8 ब - (1 जागा)
  • वरणगाव - 10 अ, 10 क - (2 जागा)
  • पाचोरा - 11 अ, 12 ब - (2 जागा)
  • भुसावळ - 4 ब, 5 ब, 11 ब - (3 जागा)

नाशिक जिल्ह्यातील एकूण 7 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • सिन्नर - 2 अ, 4 अ, 5 अ, 10 ब - (4 जागा) 
  • ओझर - 1 अ, 8 ब - (2 जागा)
  • चांदवड - प्रभाग 3 - (1 जागा)

अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 12 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • जामखेड - 2 ब, 4 ब - (2 जागा)
  • श्रीगोंदा - 7 ब - (1 जागा)
  • राहुरी- 2 अ - (1 जागा)
  • संगमनेर - 1 ब, 2 ब, 15 ब (3 जागा)
  • श्रीरामपूर - 3 अ - (1 जागा)
  • शेवगाव - 1 ब, 5 अ, 12 अ - (3 जागा)
  • शिर्डी - 6 अ - (1 जागा) 

हिंगोली जिल्ह्यातील एकूण 2 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • हिंगोली - 5 ब, 11 ब - (2 जागा)

अमरावती जिल्ह्यातील एकूण 6 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • अचलपूर - 2 जागा
  • दर्यापूर - 1 जागा
  • धारणी - 2 जागा
  • वरूड - 1 जागा

परभणी जिल्ह्यातील एकूण 3 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • जिंतूर - 11 क - (1 जागा) 
  • पूर्णा - 1 ब, 10 ब - (2 जागा) 

नांदेड जिल्ह्यातील एकूण 3 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • भोकर - 1 ब - (1  जागा) 
  • कुंडलवाडी - 3 अ - (1 जागा)
  • लोहा - 5 ब - (1 जागा)

बीड जिल्ह्यातील एकूण 10 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • धारुर - 10 अ - (1 जागा) 
  • अंबाजोगाई - 1 ब, 3 अ, 6 अ, 10 ब - (4 जागा) 
  • परळी - 9 अ, 14 ब, 3 अ, 3 ब, 11 ब - (5 जागा)

जालना जिल्ह्यातील एकूण 2 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • भोकरदन - 2 जागा

धाराशिव जिल्ह्यातील एकूण 6 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या 

  • धाराशिव - 2 अ, 7 ब, 14 ब - (3 जागा)
  • उमरगा - 3 जागा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 8 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • वैजापूर - 1 अ, 2 ब - (2 जागा) 
  • गंगापूर- 4 ब, 6 ब - (2 जागा)
  • पैठण - 3अ, 6 ब, 6 अ, 11 ब - (4 जागा)

ठाणे जिल्ह्यातील एकूण 6 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या 

  • बदलापूर - प्रभाग 5, 8, 10, 15, 17, 19 - (6 जागा)

पालघर जिल्ह्यातील एकूण 2 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • पालघर - 1 ब - (1 जागा)
  • वाडा -  प्रभाग 12 - (1 जागा)

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 2 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

  • रत्नागिरी - 2 जागा

लातूर जिल्ह्यातील एकूण 3 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

    follow whatsapp