माजी आमदार निर्मला गावित यांना कारने दिली धडक, हादरवून टाकणारी अपघाताची घटना, रुग्णालयात दाखल

Nashik Accident news : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना धडक दिली.

Nashik Accident news

Nashik Accident news

मुंबई तक

25 Nov 2025 (अपडेटेड: 25 Nov 2025, 06:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकमध्ये धक्कादायक घटना

point

इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात

Nashik Accident news : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मागून येणाऱ्या चारचाकी कारने निर्मला गावित यांना धडक दिली. या अपघातात निर्मला गावित या गंभीर जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, त्यांनी 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून त्या आमदार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ठाकरे सेनेतून बाहेर पडत एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी केली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू; पती अन् मुलंही जखमी

अशातच आता त्यांना नाशिकच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. सोमवारी झालेल्या अपघाताच्या घटनेचा थरार व्हिडिओत कैद झालेला आहे. व्हिडिओत कारने त्यांना थेट उडवल्याचं दिसून येत आहे. या अपघाताला आता अनेक वळणं दिली जात आहेत. 

निर्मला गावित कोण आहेत? 

निर्मला गावित यांची राजकीय सुरुवात ही काँग्रेस पक्षातून झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. त्यांनी दोन वेळा आमदार म्हणून काम केलं आहे. त्यांनी 2019 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्या शिंदेसेनेकडे वळल्या. 

हे ही वाचा : अमेरिकन व्हिसा नाकारल्याने महिला डॉक्टरनं घरातच उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण

शिवसेनेत पक्षप्रवेश केला असताना त्यांनी, हा पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी पक्ष प्रवेश केला आहे. तालुक्यातील प्रश्नांसाठी मोलाचा हात घालण्याची संधी मिळावी, मी आता कामाला लागणार आहे, असं देखील त्या म्हणाल्या होत्या. 

    follow whatsapp