'निलेश राणे तर देशभक्तीचं उदाहरण..', सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपची काढली पिसं.. 'तो' Video आता थेट दिल्ली दरबारी

नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशाची बॅग पकडून देणाऱ्या शिवसेना आमदार निलेश राणे यांचा उल्लेख थेट लोकसभेत करण्यात आला. सुप्रिया सुळेंनी याच मुद्द्यावर भाजपवर जोरदार टीका केली.

nilesh rane is an example of patriotism supriya sule strongly criticized bjp discussion on video given for money directly in lok sabha

सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

मुंबई तक

• 05:24 PM • 09 Dec 2025

follow google news

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकांमध्ये एक Video प्रचंड व्हायरल झाला. तो म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी निवडणुकांदरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांची लाच पकडली होती. ज्याचं त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह देखील केलं होतं. ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून भाजपवर बरीच टीकाही झाली होती. आता हाच मुद्दा देखील लोकसभेत गाजला आहे. 

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (9 डिसेंबर) लोकसभेत बोलताना निलेश राणेंनी पैसे पकडून दिल्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत भाजपवर जोरदार टीका केली. एवढंच नव्हे तर निलेश राणे हे देशभक्तीचं उदाहरण आहे. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपला चिमटेही काढले. 

पाहा सुप्रिया सुळे लोकसभेत नेमकं काय म्हणाल्या...

'महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि त्यांच्या युतीचे 200 हून अधिक आमदार आहेत. चला मानूया की, अगदी खरेपणाने महाराष्ट्रातील निवडणूक झाली. त्यानंतर आता ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे की, पहिले फॉर्ममध्ये गडबड, नंतर अर्ज मागे घेण्यामध्ये गडबड.. त्यानंतर आरक्षणात गडबड..' 

'त्यानंतर कॅश मी नाही पकडली.. इथे जे बसले आहेत, त्यांचे मित्र पक्ष असलेला एक आमदार घरात गेला.. कोणाच्या तर भाजप नेत्याच्या.. या नेत्याच्या घरातून त्यांनी लाखो रुपयांची रोकड पकडली. ही गोष्ट सगळ्या न्यूज चॅनलने दाखवली. मी काही याबाबत आरोप करत नाहीए. जे आहे ते सांगतेय.'

हे ही वाचा>> Mumbai Tak Chavadi: 'जर भविष्यात शिंदे साहेब उद्धव ठाकरेंसोबत गेले तरी मी शिदेंसोबतच राहणार', निलेश राणेंचं मोठं विधान

'रोकड रक्कम.. हे काही एक उदाहरण नाही, अशी 10 उदाहरणं मी सांगू शकते. आमच्या महाराष्ट्रात निवडणूक आयोग नाहीच. असेल तर नेमकी कुठे आहे हे आम्हाला तरी माहीत नाही. आम्ही त्यांना भेटायलो जातो तेव्हा आयोगाचं मौन व्रत असतं.' 

'निवडणुकांमध्ये बंदुकी काढल्या गेल्या, ईव्हीएमचे लॉक देखील तोडले गेले. हे सगळं टीव्हीवर दाखवण्यात आलं आहे. इथे म्हस्के आणि श्रीकांत शिंदे बसले आहेत. हे त्याच सरकारचे भाग आहेत. यांच्याच लोकांनी हे उघडकीस आणलं आहे.'

'मी पंतप्रधानांना सांगू इच्छिते की, तुम्ही देशाला एक दिशा दाखवत आहात आणि तुमचंच सरकार महाराष्ट्रात काही भलतंच करत आहे. नोटबंदी करताना पंतप्रधानांची इच्छा काय होती की, या देशातून काळा पैसा बाहेर काढायचा. असं असताना भाजपच्या नेत्याकडे एवढी कॅश कशी मिळाली? छोटी बॅग वैगरे नाही.. सुटकेसमध्ये पैसे मिळाली आहे. याची चौकशी कधी लावली जाणार आहे? माझी मागणी आहे की, याची ईडी आणि सीबीआय चौकशी झाली पाहिजे.'

हे ही वाचा>> सलग दोन दिवस फडणवीस झाले नाराज, 'ते दोन' निर्णय अन् मुख्यमंत्री निराश!

'जर हे पैसे सरकार छापत नाही, डिजिटल इंडिया बनत आहे तर एवढी रोकड महाराष्ट्रात कशी काय पकडली जाते? याची चौकशी झाली पाहिजे. यामागे मोठं रॅकेट असणार.' 

'फक्त मी आरोप नाही करत.. हे पण (शिवसेना खासदार) बसले आहेत. त्यांना विचारून घ्या. तुमचे मित्र पक्ष आहेत. राणे साहेब इथे नाहीत. पण राणे साहेबांचा मुलगा निलेश राणे हे आमच्या बरोबर खासदार म्हणून आधी निवडून आले होते.'

'मी आज ऑन रेकॉर्ड भले ते शिवसेनेत असो.. पण निलेश राणेंनी जे केलं त्याचं मी स्वागत करते. देशभक्तीचं जर उदाहरण असेल तर ते आहे निलेशजी. ते सत्ताधारी पक्षात आहे तरीही त्यांनी देशासाठी रोकड पकडून दिली. एवढंच नव्हे तर त्यांनी सगळ्या देशाला दाखवून दिलं टीव्हीवर की बघा भाजप काय करतंय.' असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

    follow whatsapp