महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार, आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'मुळे खळबळ उडाली असून, शिवसेना (UBT) चे अनेक खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Operation Tiger

Operation Tiger

मुंबई तक

17 Jun 2026 (अपडेटेड: 17 Jun 2026, 09:48 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार

point

आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ने वेग पकडला असून, यामुळे शिवसेना (UBT) मध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील सहा लोकसभा खासदार पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.  राजकीय हालचाली वाढल्या असून, काही खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. शिवसेनेचे बंडखोर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट देणार असल्याचे समजते, जिथून या संपूर्ण मोहिमेची सूत्रे हलवली जात आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…

बंडखोर खासदारांची रणनीती अत्यंत स्पष्ट असल्याचे दिसते. ते प्रथम लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा करतील आणि त्यानंतर त्याचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. या ऑपरेशनमध्ये श्रीकांत शिंदे यांचे दिल्लीतील निवासस्थान केंद्रबिंदू ठरले आहे. दुसरीकडे, शिवसेना (UBT) ने या फुटीला रोखण्यासाठी कंबर कसली असून, त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपली बाजू मांडल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची विनंती केली आहे. पक्षाने 10 व्या अनुसूचीनुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा : 'मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच', उत्तर महाराष्ट्रातील 'या' खासदाराने भूमिका केली स्पष्ट

बंडखोर खासदारांना 15 कोटी रुपयांची ऑफर, संजय राऊतांचा आरोप 

या राजकीय संघर्षात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तर शिंदे गटातील नेते कृपाल तुमाने यांनी, गेल्या एक महिन्यापासून या प्रक्रियेवर काम सुरू असल्याचा दावा केला आहे. ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारण तापले असून, आगामी काही तासांत शिवसेना (UBT) मधील ही संभाव्य फूट कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या कोणत्या वळणावर जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं होतं?

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावलेल्या बैठकीला पक्षाच्या नऊपैकी केवळ चार खासदार उपस्थित राहिले. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे यांनी उपस्थिती लावली, तर ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर या पाच खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र, ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते, असं बोललं गेलं.  ठाकरे यांनी या खासदारांना आम्ही कुठेही जाणार नाहीत, हे माध्यमांशी बोलून स्पष्ट करण्यास सांगितलं होतं. मात्र, पुढे काय घडतंय? हे सर्वजण आपण पाहत आहोत.