नवी दिल्ली: 'भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यासाठी मी मध्यस्थी केली.' असं ट्वीट करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाक युद्धबंदी झाल्याचं जाहीर केलं. पण त्यांच्या या ट्विटला 3 तास उलटत नाही तोच पाकिस्तानने भारतावर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. तर दुसरीकडे LOC जवळ देखील सातत्याने गोळीबार करण्यात आला.
ADVERTISEMENT
पाकिस्तानने केलेले हे हल्ले म्हणजे शस्त्रसंधीचं पूर्णपणे उल्लंघन आहे. ज्यामुळे भारताने देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून पाठविण्यात आलेले सगळे ड्रोन्स भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे नेस्तनाबूत करण्यात आले.
एकीकडे स्वत: ट्रम्प यांनी युद्धबंदी होत असल्याची घोषणा केलेली असताना दुसरीकडे पाकिस्तानने अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचं उल्लघंन करत त्यांची नेमकी मानसिकता काय आहे हे दाखवून दिलं आहे.
हे ही वाचा>> पाकिस्तानला युद्धबंदीचा अर्थ समजतो का? Trump यांच्या घोषणेनंतरही काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले, तुफान गोळीबार सुरू
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या या कृत्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र. या प्रकरणी ठोस आणि कठोर पावलं उचलावेत असे आदेश भारतीय लष्कराला देण्यात आले आहेत.
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर याबाबतची माहिती देण्यासाठी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी मोजकीच माहिती दिली. पाहा विक्रम मिसरी नेमकं काय म्हणाले.
रात्री उशिरा पत्रकार परिषद, पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबाबत नेमकं म्हटलं
पत्रकार परिषदेला संबोधित करताना विक्रम मिसरी म्हणाले की, 'मागील काही तासांपासून पाकिस्तानकडून घोर उल्लंघन होतं आहे. भारतीय लष्कर प्रत्युत्तर देत आहे आणि या सीमरेषा अतिक्रमणाशी लढा देत आहे. हे अतिक्रमण अत्यंत निंदनीय आहे आणि पाकिस्तान यासाठी जबाबादार आहे. आमचं मानणं आहे की, पाकिस्तानने ही स्थिती नीटपणे समजून घेतली पाहिजे.तसंच हे अतिक्रमण रोखण्यासाठी त्यांनी उचित कार्यवाही केली पाहिजे.'
हे ही वाचा>> Ceasefire म्हणजे नेमकं काय? ज्यासाठी भारत-पाक झालं तयार.. आता काय होणार?
'लष्कराने या संपूर्ण परिस्थितीवर डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवलं आहे. तसंच कोणतंही अतिक्रमण परतवून लावण्यासाठी ठोस आणि कठोर पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ADVERTISEMENT
