ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी मुंबईतील सभेत उद्योगपती गौतम अदानी यांचं मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील गेल्या 10 वर्षात पसरत जाणारं साम्राज्य दाखवत त्यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भजाप नेत्यांकडून कालपासून एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. तो म्हणजे गौतम अदानी यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट. यावरून भाजपने राज ठाकरेंवर टीका सुरू केली. ज्याला आज (12 जानेवारी) राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
'माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेलाय एकदा.. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, मुकेश अंबानीही येऊन गेलेत.. माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती, सिने कलाकार येऊन गेलेत.. घरी येऊन गेले म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?' असा सवाल करत राज ठाकरेंनी गौतम अदानींसह भाजपवर जोरदार टीका केली.
पाहा ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय म्हणाले
'काल मी त्या गौतम अदाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या.. काय पुढे सुरु केलं तर.. माझा आणि गौतम अदाणींचा एक फोटो.. बरं मग पुढे?'
'माझ्या घरी गौतम अदाणीही येऊन गेलाय एकदा.. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, मुकेश अंबानीही येऊन गेलेत.. माझ्याकडे आनंद महिंद्रा येऊन गेलेत, अनेक उद्योगपती, सिने कलाकार येऊन गेलेत.. घरी येऊन गेले म्हणून काय त्यांची पापं झाकायची का मी?'
हे ही वाचा>> 'फडणवीस म्हणतात अण्णामलाई 'तसं' म्हणालेच नाही ..', राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ.. फडणवीसांवर पडले तुटून!
'मी काल तुम्हाला दाखवलं ते इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे.. ते जो फोटो दाखवतायेत तो एक-दोन वर्षांपूर्वीचा फोटो आहे. अदाणी जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावर काय हाकलून देऊ? ज्यावेळेला या महाराष्ट्रावर संकट येईल, ज्यावेळेला या मुंबईवर संकट येईल तेव्हा राज ठाकरे दोस्ती वैगरे बघणार नाही कुठे..'
'अडाणीशी दोस्ती करण्याचा कुठे विषयच नाही.. मी इतका अडाणी नाही. पण काल मी तुम्हाला जे दाखवल त्याचं गांभीर्य समजून घ्या. मी काल तुम्हाला जे काही सांगितलं.. हा माणूस कधी सिमेंटमध्ये नव्हता तो आज दोन नंबरला सिमेंटमध्ये आलाय. सगळी विमानतळं..'
'हे मुद्दामून ज्या गोष्टी करतायेत.. आता देशातील 6 की 7 विमानतळं त्यांना दिली गेली आहेत. तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो.. यातील नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर गौतम अदानीने एकही विमानतळ या देशात बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळं गन पॉईंटवर स्वत:कडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव.'
हे ही वाचा>> संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची काढली पिसं, म्हणाले 'हरामXर हरामाचेच पैसे वाटणार..'
'बंदरं.. फक्त एकमेव गुजरातमधील मुंद्रा पोर्ट.. बाकी देशभरातील जेवढी बंदरं होती ती दुसऱ्यांची होती.. ती गन पॉईंटवर सांगितलं ही मला पाहिजे. एक विमानतळ, आणि एक बंदर सोडून या माणसाचं इथे काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाब, नरेंद्र मोदींचं नाव या एका गोष्टीवर हा माणूस देशभर पसरत गेलाय.'
'एक माणूस एवढा मोठा होता या देशात.. ते पण फक्त 10 वर्षात.. 2014 ते 2025 या अकरा वर्षात इतका मोठा झालेला, श्रीमंत झालेला जगात दुसरा माणूस नाही आणि व्यवसाय उभारता येत नाही. टाटा-बिर्ला बाकीचे सगळे उद्योगपती यांना 50-60 वर्ष लागली.' असं म्हणत राज ठाकरेंनी अदानींच्या वाढत्या उद्योगांबाबत संशय व्यक्त केला.
ADVERTISEMENT











