संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची काढली पिसं, म्हणाले 'हरामXर हरामाचेच पैसे वाटणार..'

sanjay raut : मुंबईनंतर आज दि : 12 जानेवारी रोजी सोमवारी सभेला संबोधित करताना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवला.

sanjay raut

sanjay raut

मुंबई तक

12 Jan 2026 (अपडेटेड: 12 Jan 2026, 09:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'महाराष्ट्रात हरामxर हरामाचेच पैसे वाटणार ना... राज्यात हरामाचंच राज्य सुरु'

point

अजित दादांनी भाजपवर केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी सुनावलं

Sanjay Raut : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशातच महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा फौरी झाडण्यात येत आहेत. अशातच मुंबईनंतर आज दि : 12 जानेवारी रोजी सोमवारी सभेला संबोधित करताना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवला. तेव्हा त्यांनी बोलताना गणेश नाईकांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंना सुनावलं. गणेश नाईक म्हणतात की, 'नवी मुंबईत हरामाचे पैसे वाटले जात आहेत. त्यावर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता हल्ला चढवला की, हरामाचे लोक हरामाचा पैसाच वाटणार', असं म्हणत त्यांनी टीकेची तोफ डागली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा राजकीय क्षेत्रात नसते तर कुठे असते? मुख्यमंत्र्यांनी चटकन सांगितलं...

'महाराष्ट्रात हरामखोर हरामाचेच पैसे वाटणार ना... राज्यात हरामाचंच राज्य सुरु'

त्यानंतर पुढे संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत यांनी गणेश नाईकांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंना सुनावलं. ते म्हणाले की, 'गणेश नाईक म्हणाले होते की, 'नवी मुंबईत हरामाचे पैसे वाटले जात आहेत. महाराष्ट्रात हरामखोर हरामाचेच पैसे वाटणार ना... राज्यात हरामाचंच राज्य सुरु आहे. राज्यात हरिश्चंद्राचं राज्य आता राहिलेलं नाही. या राज्याचा पालकमंत्री ठाण्याच्या मिंधेंचं वस्त्रहरण करतोय. किती थापा मारायाच्यात? जर थापा मारायचा नोबेल पुरस्कार असता, त्याचे मानकरी हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विभागून द्यायला पाहिजे. केवळ वाटून द्यायला पाहिजे एवढंच नाहीतर त्यांचा अहवाल वाटून द्यायला पाहिजे', असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला. 

हे ही वाचा : खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणारा प्रकार, बीडमध्ये पोलीस दलातील कर्मचाऱ्याने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत केलं लैंगिक शोषण

त्यानंतर अजित दादांनी भाजपवर केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी सुनावलं. अजित पवार म्हणाले होते की, 'भाजपला सत्तेचा माज आला आहे. भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, त्यांना पक्षाची मस्ती आणि माज आलेला आहे. त्यांचाच हा माज उतरवण्यासाठी हे दोन भाऊ एकत्र आले आहेत',असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

    follow whatsapp