Exclusive: 'निष्ठा पराभूत झालेली नाही, निष्ठेची चेष्टा झाली..', NCP चे माजी आमदार कोणावर संतापले?

मुंबई तक

02 Jun 2026 (अपडेटेड: 02 Jun 2026, 04:24 PM)

Pune News : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विक्रांत काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लांडे यांनी पक्षाने उमेदवार निवडताना कोणता निकष लावला, याबाबत प्रश्न उपस्थित केला.

Pune News

Pune News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

उमेदवारीवरून विलास लांडेंची नाराजी 

point

विक्रांत काकडे यांना संधी

Pune News : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विक्रांत काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लांडे यांनी पक्षाने उमेदवार निवडताना कोणता निकष लावला, याबाबत प्रश्न उपस्थित केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवेंची समृद्धी महामार्गावर झाली भेट, नेमकं काय घडलं?

उमेदवारीवरून विलास लांडेंची नाराजी 

लांडे म्हणाले की, 'निष्ठा पराभूत झालेली नाही; मात्र निष्ठेची चेष्टा झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असेल तर ती बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचे मजबूत अस्तित्व असताना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या;, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक होते. ज्यात ते स्वतःसह पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर विक्रांत काकडे यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाने हा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला, हे स्पष्ट झालं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी शहरातील नेतृत्वाला संधी मिळणे अपेक्षित होते, असे सांगताना लांडे यांनी पक्ष कमकुवत होईल असे नाही, मात्र नेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, उमेदवारी प्रक्रियेत आर्थिक व्यवहार किंवा घोडेबाजाराच्या शक्यतेबाबत विचारले असता, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा प्रभाव आणि मतांची देवाणघेवाण झाल्याचे आरोप त्यांनी केले. विधान परिषद निवडणुकीतही अशा चर्चांना उधाण येण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली. 

यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाची आठवण काढत, ते सर्वसमावेशक नेतृत्व होते आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असत, असे सांगितले. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पक्षाने एकजुटीने काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : अभिजीत दिपके भारतात परतणार, जंतरमंतरवर आंदोलन करणार, तारीख ठरली!

आगामी काळात वेगळा राजकीय निर्णय घेणार का, असा प्रश्न विचारला असता, सध्या निवडणुकीच्या काळात त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. ही निवडणूक पक्षाच्या आणि दिवंगत नेतृत्वाच्या स्वप्नाशी संबंधित असल्याने त्याच भावनेतून काम करणार असल्याचे लांडे यांनी स्पष्ट केले.