मुंबई: अवघा महाराष्ट्र ज्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची ऊत्सुकतेने वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी समीप आला आहे. हिंदी सक्तीचा जीआर सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना UBT आणि मनसेने विजयी मेळाव्याचं मुंबईत आयोजन केलं. वरळी डोम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आता त्याला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावर समान भूमिका घेऊन एकत्र येत आहे.
ADVERTISEMENT
वरळी डोममध्ये पार पडणाऱ्या या मेळाव्याची अगदी जल्लोषात तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक या मेळाव्यासाठी आले आहेत.
LIVE UPDTE:
- कार्यक्रमाच्या शेवटी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळाले
-
- आमच्यातील जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केलाय.. उद्धव ठाकरेंकडून मु्ख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता बोचरी टीका
- भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी केलं राज ठाकरेंचं प्रचंड कौतुक
-
- शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू
- मराठी या एका विषयासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली होती
- अशी कधीही गोष्ट कराल तर त्याचे व्हिडिओ काढू नका.. पण उठसूठ कोणाला मारायचं असा होत नाही.
- जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे.
- तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलात.. आता सांगून ठेवतो.. हे आता तुम्हाला पुन्हा जातीपातीत गुंतवून ठेवतील. हे लक्षात ठेवा
- 125 वर्ष आम्ही मराठ्यांनी देशावर राज्य केलं. पण आम्ही कोणत्या प्रांतावर मराठी भाषा कधी लादली का?
- जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.. आम्हाला एकत्र आणणं..
-
- राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
- शिवसेना UBT आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण क्षण
-
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही नेते एकत्रच करणार व्यासपीठावर एंट्री
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.. VIP रूममध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची काही क्षण चर्चा
- उद्धव ठाकरे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे वरळी डोममध्ये पोहचले
- राज ठाकरे आणि कुटुंबीय हे वरळी डोममध्ये दाखल
- शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरें, पुत्र आदित्य ठाकरें आणि तेजस ठाकरेंसह वरळी डोमसाठी निघाले
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवरून वरळी डोमसाठी रवाना
-
वरळी डोम येथे नेते आणि कार्यकर्ते यांची तुफान गर्दी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार?
या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना UBT पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे बंधू नेमकं काय मत मांडणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यातील लोकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात बऱ्याच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे आता नेमके राजकीय पडघम कसे उमटतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हे ही वाचा: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार.. अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता शिगेला.. राऊतांनी विरोधकांना काय सुनावलं?
आज (5 जुलै) सकाळी 11:30 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. या मेळाव्याची रूपरेषा नेमकी कशी असणार आहे? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. याचबाबत आम्ही आपल्याला नेमकी माहिती देणार आहोत. विजयी मेळाव्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे यांची भाषणं होणार असल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे. तसेच, या कार्यक्रमातील शेवटचं भाषण उद्धव ठाकरे करणार असल्याची माहितीही मिळाली आहे.
वरळीत अनेक ठिकाणी लावण्यात आले मोठे स्क्रीन
दरम्यान, कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता वरळी डोम मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्क्रीन लावण्यात येणार असून हे मार्ग वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा: 'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!
राज्यात त्रिभाषा लागू करण्याचा जीआर जारी झाल्यानंतर हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात शिवसेना पक्षाने देखील सहभाग घेतला होता. यानंतर मनसे आणि शिवसेना (UBT) पक्षाकडून 5 जुलै रोजी भव्य मोर्चा देखील निघणार होता. मात्र, हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि शिवसेना पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील सरकारने त्रिभाषा सूत्राचा आदेश मागे घेण्यात आला. त्यामुळे आता ठाकरे बंधूनी एकत्र येऊन या विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
ADVERTISEMENT
