Raj Thackeray : ठाण्यातल्या पोखरण रोड नं. 2 गांधीनगर येथे काल 23 नोव्हेंबर रोजी रात्री धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने दारू पिऊन धुडगुस घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शिवीगाळ केली. 'यै मुंबई नाही, गांधीनगर है, इधर भैयालोग का चालेगा....' असं वक्तव्य करत मुजोरी दाखवली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Dharmendra Passed Away : अलविदा धर्मेंद्रजी! वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
परप्रांतीय तरुणाकडून राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ
संबंधित रिक्षाचालक हा परप्रांतीय असल्याची माहिती समोर आली आहे. तो एवढ्यावरच न थांबता त्याने राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ केली. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहित समोर आल्यानंतर मनसेनं लगेच ठाणे गाठलं. दरम्यान, या वादाचं कारण आता समोर आलं आहे. गाडी लावण्यावरुन हा झाला वाद झाला. हा वादा झाला त्यानंतर ठाण्यातील गांधीनगर परीसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले.
शिवीगाळमुळे मनसैनिकांचा संताप
राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याने तसेच शिवीगाळमुळे आता मनसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं, मनसैनिकांनी पोलीस ठाण्यातच त्याला मारहाण केली. त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये झालेला आहे, आमच्या मनसैनिकांनी त्याला जो महाप्रसाद द्यायचा तो पोलीस स्टेशनच्या आतून दिलेला आहे असं अविनाश जाधव म्हणाले.
हे ही वाचा : जालन्यात दिवसाढवळ्या माजी सरपंचाला तलवारीने सपासप वार करत संपवलं, चेहरा देखील ओळखू येईना..
परप्रांतीयांच्या मुजोरीत वाढ
पोलिसांशी त्यांचं काय बोलणं झालं, राज ठाकरे काय म्हणाले याबाबतही अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे. दरम्यान, परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात मुजोरी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT











