मनसेला मतं पडतात जर सगळंच काढलं तर 10-12 वर्षांचा खेळ... मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं रोखठोक विधान

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतांच्या चोरीवरून निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. ते पुण्यातील आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून 24 ऑगस्ट रोजी बोलत होते.

Raj Thackeray

Raj Thackeray

मुंबई तक

24 Aug 2025 (अपडेटेड: 24 Aug 2025, 06:59 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं मोठं विधान

point

निवडणूक आयोगाला थेट सांगितलं

point

...तर 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल

Raj Thackeray Over Fake Voting : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतांच्या चोरीबाबत एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला धारेवर धरलं. त्यानंतर राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मत चोरीबाबत एक पत्रकर परिषद घेतली. त्यानंतर भाजपने केलेल्या मत चोरीच्या काळाबाजाराविषयी आणि निवडणूक आयोगाच्या कामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतांच्या चोरीवरून निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. ते पुण्यातील आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून रविवारी 24 ऑगस्ट रोजी बोलत होते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : हुंडाबळी! पीडित सूनेला सासरच्यांकडून 35 लाखांची मागणी, पत्नीनं विरोध करताच जिवंत जाळलं, नेमकं काय घडलं?

"आपल्या मतांमध्ये काहीतरी गडबड"

तेव्हा ते संबोधित करताना कार्यकर्त्यांना म्हणाले की, मी सांगतोय की, आपल्याला मत पडत नाही असं अजिबातच समजू नका. आपल्या मतांमध्ये काहीतरी गडबड आहे. आपली मतं चोरीला जात आहेत. त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला समोरं जावं लागत आहे. मतांची जी चोरी होत आहे ते सर्वजण सत्तेत असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी नाव न घेता महायुतीवर टीकेचे अस्त्र डागले आहे.

मतांच्या चोरीबाबत सर्वच सांगितलं

भाजपने 132, शिंदे (गट) 56 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 42 जागा जिंकल्या. एकूण 232 जागा आल्या. एवढं बहुमत मिळूनही राज्यात एवढा सन्नाटा पसरला होता. कुठेही कसलाही जल्लोष दिसत नव्हता. जे विजयी झालेत त्यांनाही पटत नव्हते आणि जे पराभूत झालेत त्यांनाही पटत नव्हते. कारण हा सर्व मतांचा गोंधळच होता. या मातांमध्ये 2014 पासून सत्ता राबविली गेली, असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : पुण्यातील भररस्त्यात शाळेच्या आवारात तरुणींच्यात तुफान राडा, बॉयफ्रेंडला मेसेज केल्यानं लाथा बुक्क्यांनी मारहाण अन् वाद पेटला

..तर 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडू शकतो.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. निवडणूक जिंकायची असल्यास मतदारयादीतला घोळ उघड पाडा, असे राज ठाकरे म्हणाले. नुकतीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली तेव्हा शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्याचवेळी भाजप नेते अनुराग ठाकूर यांनीही सहा मतदारसंघाचा संदर्भ देत आरोप केला. आता एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीच्या गोंधळावर आरोप करत आहेत. तर यात आता निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई केली पाहिजे. पण हे सर्व प्रकरण दाबण्यात येत आहे. राहुल गांधींनी केलेल्या आरोपाची चौकशी केली असता, 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडू शकतो.

    follow whatsapp