'विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही पण...', पाहा शरद पवारांनी कोणाचे टोचले कान

मुंबई तक

04 Sep 2026 (अपडेटेड: 04 Sep 2026, 12:36 PM)

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. मत व्यक्त केल्यामुळे हल्ला होणं हा लोकशाहीवरील आघात असल्याचं सांगत, त्यांनी कठोर धोरणाची मागणी केली.

sharad pawar pune ganeshotsav vidyanand bapat attack reaction dj controversy

पाहा शरद पवार विद्यानंद बापटांबाबत काय म्हणाले

Google CTA

पुणे: पुण्यातील विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही, पण ते जे बोलत आहेत त्याला अर्थ आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सण-उत्सवांमधील डीजेचा आवाज आणि रस्त्यावरील कार्यक्रमांबाबत मत व्यक्त केलं. केवळ मत व्यक्त केल्यामुळे एखाद्यावर हल्ला होणं, हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवरचा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच, अशा घटना थांबवण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने कठोर धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

‘विद्यानंद बापट जे बोलत आहेत त्याला अर्थ आहे’

विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. बापट यांना आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसल्याचं सांगत, त्यांनी मांडलेल्या मुद्द्याला अर्थ असल्याचं पवार यांनी म्हटलं.

“विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही. पण विद्यानंद बापट जे बोलत आहेत त्याला अर्थ आहे.”

सण आणि उत्सव हे लोकांना आनंद देणारे असले पाहिजेत, असं शरद पवार यांनी म्हटलं. मात्र, डीजेच्या आवाजामुळे आणि रस्त्यावरील कार्यक्रमांमुळे सणाचं गांभीर्य कमी होतं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

‘मत व्यक्त केलं म्हणून थेट हल्ला हा लोकशाहीवरील आघात’

एखाद्या व्यक्तीने सण-उत्सवांबाबत आपलं मत व्यक्त केलं म्हणून त्याच्यावर हल्ला होणं, हे लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवरचं आक्रमण असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा>> विद्यानंद बापटांना मारहाण करणारा मंडळाचा मारकुट्या कार्यकर्ता कोण? कुंडली आली समोर

“कोणताही सण, उत्सव हा सुखद असला पाहिजे, लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेच्या आवाज आणि रस्त्यावरचे कार्यक्रम यामुळे त्या सणाचं गांभीर्य निघून जातं. आणि म्हणून कोणी तरी त्याबाबतचं मत व्यक्त केलं म्हणून त्यांच्यावर हल्ला, हे माझ्या मते लोकशाही, मूलभूत अधिकारावरचा हल्ला आहे.”

पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज 

या प्रकरणात पुण्याचे पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने अशा घटकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. हल्ल्याच्या घटनेचा निषेध करणाऱ्या अनेकांच्या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा>> 

“पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य सरकारने यांनी अशा घटकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनेकांनी या कृत्याचा निषेध केला. त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.”

‘हे थांबवायचं असेल तर सक्तीचं धोरण स्वीकारलं पाहिजे’

अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी केवळ निषेध करून चालणार नाही, तर त्यासंबंधी सक्तीचं धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

“हे थांबायला पाहिजे. आणि हे थांबवायचं असेल तर यासंबंधी सक्तीचं धोरण स्वीकारलं पाहिजे.”

‘सोलापुरात असा निर्णय घेतलाय, असं निर्णय घेण्याची गरज’

सोलापुरात अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचं आपण आता वाचल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. अशा निर्णयांची आवश्यकता असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.

“मी आता वाचलं.. सोलापूरमध्ये हा निर्णय घेतलाय. असंय की, असे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. बघूया..” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी याबाबत दिली आहे.