Lok Sabha 2024 : भाजपची झोप उडवणारी भविष्यवाणी; थरूरांनी सांगितलं किती जिंकतील जागा?

भागवत हिरेकर

• 06:18 AM • 16 Jan 2024

भाजपच्या जागा जेव्हा कमी होतील, तेव्हा एनडीएच्या मित्रपक्षांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होईल. भाजपचे मित्रपक्ष विरोधी आघाडीला पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे. भाजपच्या जागा कमी होताच एनडीए तुटेल आणि तो भारतासोबत एकत्र येईल, असे शशी थरूर म्हणत आहेत.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Lok Sabha 2024 Election Predictions : लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण, काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी भाजप किती जागा जिंकेल याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. ज्या दिवशी भारत न्याय यात्रेची सुरूवात झाली, त्याच दिवशी शशी थरूर यांनी केरळ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल राजकीय भविष्यवाणी केली आहे. थरूरांनी भाजपला बहुमत मिळणार नाही, असे भाकित करताना त्याचं कारणही सांगितलं आहे. (Congress Leader Shashi Tharoor on Lok Sabha 2024 Election Predictions)

हे वाचलं का?

शशी थरूरांच्या अंदाजानुसार, जर भाजच्या जागा घटल्या तर एनडीएतील इतर घटक पक्षांचा विश्वास कमी होईल. असंही होऊ शकत की एनडीएतील घटक पक्ष इंडिया आघाडीला समर्थन देतील. भाजपच्या जागा कमी होताच एनडीएमध्ये फूट पडेल आणि त्यातील घटक पक्ष इंडिया आघाडीत येतील.

काँग्रेस चांगली काम करेल -शशी थरूर

शशी थरूर यांचं असं म्हणणं आहे की, ‘भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खूप चांगली कामगिरी केली होती, पण आता तशी यश त्यांना मिळणार नाही. काँग्रेसला अनेक राज्यांत शून्य जागा मिळाल्या, पण यावेळी चांगली कामगिरी करेल.’

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंकडून ‘पवार पॅटर्न…’, श्रीकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करायची तयारी, पण…

शशी थरूर यांनी या राजकीय भाकितामागील कारणही सांगितलं. असं कसं घडू शकतं या प्रश्नाला उत्तर देताना थरूर म्हणाले, “इंडिया आघाडीतील जागावाटपातून असं घडणं शक्य आहे. काही राज्यांत सर्व विरोधी पक्षांमध्ये एकमत होऊ शकते. त्यामुळे भाजपविरोधात एकास एक उमेदवार दिला जाऊ शकेल. दुसरीकडे काही राज्यांत दोन वा तीन उमेदवार असू शकतात. जर इंडिया आघाडीने राज्यांमधील जागावाटप चांगल्या प्रकारे केले, तर विरोधक पराभवापासून वाचू शकतात.”

हेही वाचा >> “…तर हा प्रसंग आला नसता”, नार्वेकरांचा संताप; ठाकरेंना सुनावलं

‘अब की बार ४०० पार’

शशी थरूर भाजपच्या जागा घटू शकतात, असे राजकीय भाकित करीत असले, तरी भाजप मात्र पूर्णपणे ताकद लावताना दिसत आहे. पक्षाचे ४०० पेक्षा जास्त उमेदवार लोकसभा निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मते मिळवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी राम मंदिराचे श्रेय घेतानाही भाजप दिसत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची ठरेल, असेच दिसत आहे.

    follow whatsapp