Kalyan: उद्धव ठाकरेंकडून ‘पवार पॅटर्न…’, श्रीकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करायची तयारी, पण…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

uddhav thackeray follows pawar pattern shiv sena ubt plans strategy to defeat shrikant shinde in kalyan lok sabha constituency
uddhav thackeray follows pawar pattern shiv sena ubt plans strategy to defeat shrikant shinde in kalyan lok sabha constituency
social share
google news

Uddhav Thackeray follow Pawar Pattern: कल्याण: महाराष्ट्रात विधानसभा 2019 च्या निवडणुकीने राज्यासह देशभरातील सगळं राजकारणच बदलून टाकलं. अनपेक्षितपणे भाजपच्या कमी झालेल्या जागा अन् शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करून मिळवलेली सत्ता याने देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र, 2022 साली एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांचं मुख्यमंत्री पद गमवावं लागलेलं. असं असताना आता पक्ष आणि चिन्ह गमवण्याची नामुष्की देखील ठाकरेंवर ओढावली आहे. त्यामुळे याच गोष्टीचा राजकीय बदला घेण्याचा निश्चिय करून उद्धव ठाकरे हे स्वत: रिंगणात उतरले आहेत. पण यासाठी त्यांनी ‘पवार पॅटर्न’ (Pawar Pattern) वापरण्याचं निश्चित केलं आहे. (uddhav thackeray follows pawar pattern shiv sena ubt plans strategy to defeat shrikant shinde in kalyan lok sabha constituency)

आता तुम्ही म्हणाल की, उद्धव ठाकरे आणि पवार पॅटर्न हे काय नवीन…? तर त्याबाबत आम्ही तुम्हाला थोडंसं उलगडून सांगणार आहोत.. म्हणजे कसंय ना.. तुम्हाला कन्फूजन राहणार नाही!

चला तर जाणून घेऊया उद्धव ठाकरेंचा ‘पवार पॅटर्न’ आहे तरी काय..

शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा रोवला अन् उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं. एवढंच नव्हे तर स्वत:चा पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांना गमवावं लागलं. खरं तर हा घाव ठाकरेंच्या जास्तच जिव्हारी लागला.. एकीकडे सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा ठाकरेंचा विरोधात गेलेला असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याचा निश्चय करून उद्धव ठाकरेंनी थेट जनतेत जाणं पसंत केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ज्याची सुरुवात आता त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातून केली आहे. दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी दौरा करत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. इथेच पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी ‘पवार पॅटर्न’ वापरला.

आता तुम्ही म्हणाल की, हा पवार पॅटर्न नेमका काय?.. तर ते जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंस मागे जावं लागेल..

महाराष्ट्रात 2019 ची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असतानाच साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक देखील त्याच वेळी लावण्यात आली होती. कारण अवघ्या पाच-सहा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीतच साताऱ्याची पोटनिवडणूक लावण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची बनली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mahayuti : “…तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का?”, गुलाबराव पाटलांचा भाजपला रोकडा सवाल

एकीकडे उदयनराजेंसारखा प्रचंड चर्चेत असणारा उमेदवार, भाजपची ताकद.. या सगळ्या गोष्टी असताना उदयनराजे पुन्हा खासदार होतील असा सर्वांचा होरा होता. पण एक अशी व्यक्ती होती की, ज्यांनी सर्वांचा होरा चुकवत भाजपला अक्षरश: कात्रजचा घाट दाखवला होता. आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार…

ADVERTISEMENT

निवडणूक प्रचारसभेच्या अगदी शेवटच्या क्षणी भर पावसात साताऱ्यात सभा घेत शरद पवार यांनी सातारा लोकसभेसह संपूर्ण विधानसभेचंच चित्र पालटून टाकलं होतं.

साताऱ्यातील पावसाच्या सभेतील शरद पवारांचं भाषण जसच्या तसं…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी साक्षात वरूण राजाने देखील आपल्याला आशीर्वाद दिले. त्यांच्या आशीर्वादाने आज सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे. त्या चमत्काराची सुरुवात उद्याच्या 21 तारखेला होणार आहे. विधानसभेची निवडणूक आहे.. लोकसभेची निवडणूक काढली आहे. एका दृष्टीने मी विचार करत होतो की, आज तुमच्या पुढे काय बोलावं..? पण माझ्या मनात एक गोष्ट आली एखाद्या माणसाकडून चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते.

लोकसभा उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणाने इथे कबूल करतो. पण मला आनंद हा आहे की, ती चूक दुरूस्त करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील घराघरातील प्रत्येक तरूण वडीलधारी सगळेजण 21 तारखेची वाट बघतायेत.. 21 तारखेला आपल्या मताचा निर्णय घेऊन.. श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील आणि जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्या चुकीच्यासंबंधी जे काही निर्णय घ्यायचाय तो आमच्या दृष्टीने घेतील.

निवडणूक महत्त्वाची आहे.. देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येऊन गेले.. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) सांगतात आम्हाला निवडणुकीत काही दिसतच नाही. ते म्हणतात या निवडणुकीला दुसरा पैलवान दिसत नाही. मी त्यांना जाहीरपणाने त्यांना सांगितलं तुमच्याकडे पैलवान असतील.. मला काही त्याबद्दल म्हणायचं नाही. पण या तालुक्यात अनेक उत्तम पैलवान तयार करण्याचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत. तसंच कुस्ती, पैलवान वैगरे हा भाजपवाल्यांच्या तोंडात न शोभणारा शब्द आहे.

म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाहीए. आज या निवडणुकीत ज्या दिवशी तुम्हाला मत द्यायची संधी मिळेल त्या दिवशी तुमचा निकाल जो आहे संबंध महाराष्ट्राला सांगणार आहे की, सातारा जिल्हा हा शब्दाचा पक्का.. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा.. तो इतिहास उद्या तुम्हाला करायचा आहे. असं भाषण करत पवारांनी सातारकरांच्या काळजालाच हात घातला होता.

शरद पवारांनी उमेदवार निवडताना झालेली चूक जाहीरपणे मान्य करणं हे मतदारांना अगदीच मनाला भिडलं.. आणि त्याचाच परिणाम म्हणून साताऱ्याचा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभव होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला..

हे ही वाचा>> ‘ठाकरेंनी लोकसभेचं खातं उघडून दाखवावं’, गिरीश महाजनांचं थेट चॅलेंज

आता आम्ही जे आपल्याला सांगत होतो तो हाच पवार पॅटर्न… थेट जनतेत जाऊन आपली चूक झाली हे मान्य करणं.. बड्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे जनतेची माफी मागणं हे काहीसं भावनिक राजकारण असलं तरी त्यात शरद पवार हे यशस्वी ठरले होते. कारण त्यामुळेच साताऱ्याची जागा राखण्यात त्यांना यश आलं होतं.

उद्धव ठाकरेंनी फॉलो केला पवार पॅटर्न?

आता आपण पुन्हा येऊयात उद्धव ठाकरेंकडे… की, त्यांनी कसा ‘पवार पॅटर्न’ फॉलो केला…

उद्धव ठाकरेंनी राजकीयदृष्ट्या सारं काही गमावलेलं असताना पुन्हा लढण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलालाच टार्गेट करायचं हे ठरवलं. यावेळी ते स्वत: कल्याण मतदारसंघात गेले. त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते आधी आपण पाहूयात..

कल्याण मतदारसंघ हा सुरुवातीपासून आपल्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांनी-ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली त्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे. पंतप्रधान काल खूप काही बोललेत.. घराणेशाहीवरही बोलले.. म्हणून योगायोग असेल.. काल ते येऊन गेले. आज मी अशा मतदारसंघात आलोय की, जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला गाडायची आहे.

अशी ही सगळी गद्दारांची घराणेशाही आहे ती गाडून टाकायची आहे. ही घराणेशाही किंवा गद्दारी केवळ लोकसभेत नाही तर विधानसभेत सुद्धा गाडावी लागेल. महापालिका कधी होतील? घाबरतायेत..

आज मला बरं वाटलं.. कारण ज्यांना असं वाटत होतं की, कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे अपने बाप की जायदाद है… असं त्यांना वाटलं होतं. कारण त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती. चूक माझी आहे.. पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे. यावेळेला मी सुद्धा ती सुधारणार आहे.

देशभर निवडणूक तर होणार आहे.. पण कल्याण मतदारसंघावर विशेष जबाबदारी आहे. नुसता गाडायचा नाही… तर पाताळात गाडायचा.

आतापासूनच कामाला लागा.. आपला जो निष्ठावंत उमेदवार मी तुम्हाला देईन.. होय आता मी निष्ठावंत देणार आहे. गद्दार देणार नाही.. आता त्यावेळेला ती चूक झाली. कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो. पण यांना धुणीभांडीच करायची होती.. म्हणून हे सुरतेला गेले, गुवाहटीला गेले.. अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

आणि हाच तो ‘पवार पॅटर्न…’ ज्या पद्धतीने शरद पवार यांनी थेट जनतेत जाऊन उमेदवार निवडण्यात आपली चूक झाली हे मान्य केलं.. तशाच स्वरुपाचं भाषण हे उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. आपली देखील उमेदवार निवडण्यात चूक झाली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी तेथील शिवसैनिकांना चुचकारण्याचा यावेळी प्रयत्न केला.

उद्धव ठाकरेंकडून श्रीकांत शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करायची तयारी, पण…

दरम्यान, असं असलं तरी उद्धव ठाकरेंची ही रणनिती यशस्वी होईल का? हा देखील सवाल आहे. कारण श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना पराभूत करणं तेवढं सोप्पं नाही. कारण मागील दोन टर्ममध्ये खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा चांगलाच जम बसवला आहे.

मात्र, तरीही पक्षांतर्गत नाराजी, शिवसेनेतील फूट.. आणि भाजपचा श्रीकांत शिंदेंना असणारा विरोध या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी आतापासून शिंदेंविरोधात रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. ज्याची त्यांनी सुरुवात केलीए थेट पवार पॅटर्नपासून…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT