मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा रामरक्षा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (UBT) आमनेसामने आले आहेत. शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर टीका केल्यानंतर शिवसेना (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
ADVERTISEMENT
रामदास कदम काय म्हणाले?
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा म्हणणं हा मोठा विनोद असल्याचे म्हटलं.
त्यांच्या मते, काँग्रेस आणि गांधी कुटुंबासोबत राजकीय आघाडी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा मांडणं हे जनतेला मान्य होणार नाही. त्यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीचाही उल्लेख करत, उद्धव ठाकरे यांचे सध्याचे हिंदुत्वावरील भाष्य हे केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा>> "मुख्यमंत्री आहेस ना तू..", फडणवीसांच्या विधानसभेतील भाषणावरुन राज ठाकरे संतापले
कदम यांनी पुढे दावा केला की, जनता सर्व काही पाहत असून आता ती अशा भूमिकांवर विश्वास ठेवणार नाही.
किशोरी पेडणेकरांचा जोरदार पलटवार
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
'रामरक्षा काय रामदास कदमच्या बापाने लिहिलीय? हे बोलायला त्यांनी कोणी दिला अधिकार? अरे आधी तुला बोलताय येतं बघ.. काही बोलता.. म्हणजे तुम्हाला अभय आहे केंद्रापासूनचं म्हणून काही कराल? अहो लाज बाळगा.. त्या रामरक्षामध्ये ढुंगणाचं सोडलं आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर टाकलं.. ढुंगणाचं जे धोतर आहे ना.. सोडलं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर टाकून चोऱ्या झाल्या.'
'हे पण तुमच्याच लोकांनी आणलंय. सत्तेत बसलेल्या लोकांनी बाहेर आणलं. त्याची लाज बाळगा. उद्धवजींनी रामरक्षा म्हणण्याचं.. अरे काय तुझ्या बापाने लिहिली रामरक्षा? उद्धवजींनी म्हणायची नाही.. तू कोण? उगाच काहीतरी बोलून हे असे मायलेज घेऊ नका.'
हे ही वाचा>> पवार स्वत: शिंदेंच्या दालनात गेले.. याचा अर्थ दिसतो तेवढा सरळ-सोप्पा नाही! भेटीमागची भन्नाट Inside Story
'रामरक्षा तुम्हाला वाटेल तेव्हा आम्ही बोलायची? आम्हाला वाटतंय आता देशाचं.. ज्या रामाला असं पकडून नेलं त्या रामामध्ये डल्ले मारताय.. त्यावर बोला.. राजकारण करता, तुमच्या बापाने लिहिली काय रामरक्षा?' अशी जहरी टीका किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांवर केली.
राजकीय वातावरण तापलं
उद्धव ठाकरे यांच्या धार्मिक भूमिकेवरून सुरू झालेला हा वाद आता हिंदुत्व विरुद्ध राजकीय भूमिका या मुद्द्यावर पोहोचला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता, या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT












