Yogesh Kadam : 'गुवाहाटीसाठी भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते', शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

09 Mar 2024 (अपडेटेड: 09 Mar 2024, 03:42 PM)

Yogesh Kadam Sensational Secret Explosion : गुवाहाटीला येण्यासाठी भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना या गोष्टीची कल्पना होती, असा खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केला आहे.

shiv sena bhaskar jadhav ready to join rebel shinde group guwahati mla yogesh kadam maharashtra politics

गुवाहाटीला येण्यासाठी भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना या गोष्टीची कल्पना होती,

follow google news

Yogesh Kadam Sensational Secret Explosion Thackery MLA Bhaskar Jadhav : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठून महाविकास आघाडीला मोठा झटका दिला होता. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करून त्यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापण केली होती. त्यामुळे शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीच सरकार कोसळलं होतं. यावेळी शिंदेंच्या बंडात आणखीण आमदार सामील होणार होता. हा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) होता. भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदेंच्या (Shinde Mla) आमदाराने केला आहे. (shiv sena bhaskar jadhav ready to join rebel shinde group guwahati mla yogesh kadam maharashtra politics) 

हे वाचलं का?

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. योगेश कदम टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना योगेश कदम म्हणाले की, गुवाहाटीला येण्यासाठी भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना या गोष्टीची कल्पना होती, असा खळबळजनक दावा योगेश कदम यांनी केला आहे. 

हे ही वाचा : "शरद पवार आजपर्यंत हेच करत आलेत", राज ठाकरेंची फटकेबाजी

काय म्हणाले योगेश कदम? 

''ज्यावेळेस आम्ही गुवाहाटीला होतो, त्याचवेळेस भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती होती'', असे योगेश कदम यांनी सांगितले आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि उदय सामंतांना विचारलं होतं, भास्कर जाधव यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे? त्यावेळी भास्कर जाधव सारखी व्यक्ती आपल्यासोबत नको, ही भूमिका आम्ही मांडली होती, असे योगेश कदम यांनी सांगितले. 

हे ही वाचा : "नाहीतर शिवसेनेची मते भाजप-राष्ट्रवादीला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?

पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले की, स्वत:चं खरं आहे, हे रेटून नेण्याचा प्रयत्न करायचा आणि पक्षांमध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे. या व्यतिरीक्त त्या व्यक्तीला काही करता येत नाही.म्हणून त्याचवेळेला त्यांना नकार दिला होता, असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. दरम्यान आता योगेश कदमांच्या दाव्यावर भास्कर जाधव काय प्रतिक्रिया देतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

    follow whatsapp