Satara Lok Sabha election 2024 : श्रीनिवास पाटलांची माघार, आता शरद पवारांसमोर पर्याय काय?

भागवत हिरेकर

• 03:32 PM • 29 Mar 2024

Shrinivas Patil Sharad Pawar Satara Lok Sabha Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास श्रीनिवास पाटील यांनी असमर्थतता दर्शवली आहे. त्यामुळे पवारांकडून नव्या पर्याय चाचपून बघितले जात आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण कोण आहेत इच्छुक?

एकापेक्षा जास्त जण लढण्यास उत्सुक आहेत, असे पवार साताऱ्यात बोलताना म्हणाले.

follow google news

Sharad Pawar Satara Lok Sabha election 2024 : "श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे", असे शरद पवारांनी साताऱ्यात जाऊन जाहीर केले. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार कुणाला उमेदवारी देणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. पवारांकडे कोणते पर्याय आहेत आणि कोणती नावे चर्चेत आहेत?

हे वाचलं का?

शरद पवारांच्या दौऱ्यामध्ये साताऱ्याच्या उमेदवाराचा निर्णय होऊ शकतो, असे म्हटले जात होते. पण, आता उमेदवार निवडीचा पेच आणखी वाढला आहे. कारण श्रीनिवार पाटलांनी माघार घेतली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी येथून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पण, पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काही नावांचा उल्लेख केला. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याचीही उत्सुकता वाढली आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, तर शरद पवारांचाही प्रभाव आहे. गेल्या वेळी पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळीही ताकद असलेला उमेदवार द्यावा लागणार आहे. 

कोणती नावे चर्चेत आहेत?

श्रीनिवास पाटील हे यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांचे नाव चर्चेत आहे. सारंग पाटील हे सार्वजनिक जीवनात सक्रीय होत असल्याचे दिसत आहे. पण, ते उमेदवार म्हणून सक्षम ठरणार नाही, याची पक्षालाही कल्पना आहे. 

हेही वाचा >> 'या' एका जागेमुळे ठाकरे-शिंदेंची वाढली कटकट!

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यापैकी वाईचे आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत आहेत. दुसरे आमदार बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरचे आमदार असून, ते शरद पवारांसोबत आहेत. 

शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील आणि सुनील माने 

सातारा लोकसभेसाठी बाळासाहेब पाटील यांचे नावे शर्यतीत आहे. बाळासाहेब पाटील यांची प्रतिमा आणि काम चांगलं आहे. मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे, पण जिल्ह्यात ते विरोधी उमेदवारांसमोर आव्हान उभं करू शकतात का, याबद्दल शंका आहेत. १९९९ पासून ते कराड उत्तर मतदारसंघातून निवडून येत आहेत. २००९ मध्ये तिकीट नाकारण्यात आल्यानंतर ते अपक्ष लढून निवडून आले होते. पण, जिल्हाभर त्यांचा प्रभाव नाही, हीच मर्यादा आहे. पण, पक्षाचा प्रभाव असल्याने त्यांचा विचार होऊ शकतो.

हेही वाचा >> 'वंचित' वसंत मोरेंना पुण्यातून देणार लोकसभेची उमेदवारी?

सातारा लोकसभेसाठी जे दुसरे नाव आहे, ते म्हणजे शशिकांत शिंदे यांचं. कोरेगाव लोकसभा मतदारसंघातून महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांना उमेदवारी दिल्यास ते उदयनराजेंना तगडी फाईट देतील का, याबद्दल सांशकता आहे.

हेही वाचा >> मराठा समाजाच्या बैठकीत तुफान राडा का झाला? वाचा Inside Story 

जिल्हाध्यक्ष असलेल्या सुनील माने यांचेही नाव उमेदवारीच्या स्पर्धेत आहे. सुनील माने यांचा कोरेगाव आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात थेट संपर्क आङे. गेल्या 10 वर्षांपासून ते सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. बाळासाहेब पाटील यांच्या २००९ मधील विजयात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. यात आणखी एक नाव आहे, ते म्हणजे सत्यजित पाटणकर यांचे. जिल्हा बँकेचे संचालक असलेल्या पाटणकर यांचाही विचार होऊ शकतो. अनेक पर्याय असले तरी तगडी फाईट देईल असा उमेदवार देणे हेच सध्या पवारांसमोर आव्हान आहे. 

भाजपकडून उदयनराजे भोसले

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. तशी घोषणा झालेली नसली, तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीच याला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे उदयनराजेंविरोधात गेल्यावेळी पवारांनी श्रीनिवास पाटलांसारखा तगडा उमेदवार उभा केला होता. आता तसाच पर्याय पवार शोधताना दिसत आहेत. 

    follow whatsapp