Uddhav Thackeray appointed as the chairman of the public trust of Balasaheb Thackeray national memorial : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सार्वजनिक न्यासाच्या अध्यक्षपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढत याबाबतची घोषणा केली आहे. शिवाय आमदार आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची 3 वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय जसाच्या तसा
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्याकरीता मुंबई येथे व्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क, दादर येथील 'महापौर बंगला" या जागेची निवड केली आहे. सदर स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार दि.२७ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये श्री. उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास व संस्था स्थापन करण्यात आलेली होती. दि.२५.११.२०१९ च्या पत्रान्वये श्री. उध्दव ठाकरे, अध्यक्ष, स्वर्गीय श्री. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने तसेच न्यासाच्या विधानपत्र (Memorandum of Association) आणि नियम व नियमावली (Hules And Regulation) मधील अ.क्र. १४ येथील तरतूदीनुसार न्यासावरील अध्यक्ष व इतर सदस्यांचा प्रथम नियुक्तीचा ३ वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने पदसिध्द सदस्य वगळता अध्यक्ष व सदस्यांची पदे भरण्याबाबतचा दिनांक १३ मार्च, २०२० रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता. पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष व इतर सदस्यांची न्यासावरील ५ वर्षाची मुदत दि. ११ मार्च, २०२५ रोजी संपल्याने सदर पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता.
आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रयोजनार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष व इतर सदस्य पदांवर खालीलप्रमाणे नव्याने नियुक्ती करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
उपरोक्त अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीमुळे झालेल्या बदलाच्या अनुषंगाने सार्वजनिक न्यासाचा व संस्थेचा नोंदणी अर्ज धर्मदाय आयुक्त यांचेकडे दाखल करण्यास श्री. सुभाष राजाराम देसाई, सचिव, शासकीय सार्वजनिक न्यास यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने श्री. सुभाष राजाराम देसाई यांनी "बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक" या नावाने सार्वजनिक न्यासाची मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० व संस्थेची सहकारी संस्था नोंदणी अधिनियम, १९६० अन्वये केलेल्या नोंदणीच्या अनुषंगाने आता झालेल्या अध्यक्ष व इतर पदांवरील झालेल्या बदलाबाबतच्या नोंदणी संदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.
उपरोक्त नियुक्त करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाने व्यासाच्या विधान (Memorandum of Association) आणि नियम व नियमावली pules and Regulations) यातील तरतुदीस अनुसरुन न्यासाचे कामकाज करावे, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्य www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक क्रमांक २०२५१११५२०००२४१२०० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











