Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत कलह, थेट राजीनामे... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 10:27 PM • 05 Aug 2024

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. जाणून घ्या नेमकं काय घडतं आहे.

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

ठाकरेंच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांना उमदेवारी दिली आहे.

Google CTA

Shiv Sena UBT: मुंबई: राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार असून त्यासाठी आता सर्वच पक्ष हे सज्ज झाले आहेत. असं असताना दुसरीकडे  शिवसेना ठाकरे  गटात मात्र मोठा अंतर्गत कलह उफाळून आला आहे. 'मातोश्री'वरील नेते उद्धव ठाकरेंना भेटू देत नसल्याचा आरोप करत पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं आता समोर आलं आहे. (uddhav thackeray internal strife in shiv sena thackeray group immediate resignation what exactly happened)

हे वाचलं का?

नेमकं काय घडतंय ठाकरेंच्या शिवसेनेत? 

शिवसेना (UBT) चं संपूर्ण राजकारण हे ठाकरे कुटुंबाभोवती आजवर फिरत आलं आहे. त्यामुळे पक्षातील सर्वांनाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचायचं असतं. पण सर्वांनाच त्यांची भेट घेणं हे शक्य होत नाही. यातूनच आता एक नवा कलह सुरू झाला आहे.

हे ही वाचा>> Raj Thackeray: हॉटेलमध्ये राडा, मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं... काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला आणि पालघर विधानसभा क्षेत्रातील विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपविभाग प्रमुख ते सर्व शाखाप्रमुख आणि महिला संघटकांचे अचानत राजीनाम सत्र सुरू झालं आहे. 

कुर्ला विधानसभेतील विभागप्रमुख डॉ. महेश पेडणेकर यांच्यासह सर्व शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. तर पालघरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कुर्ला विधासनभेतील पदाधिकाऱ्यांनी थेट रवी म्हात्रे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'आम्ही उद्धव ठाकरेंना भेटू नये यासाठी अडथळे निर्माण केला जात आहेत.' असा आरोप कुर्ल्यातील पदाधिकाऱ्यांनी म्हात्रेंवर केला आहे.

हे ही वाचा>> Prakash Ambedkar : 'मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस', आंबेडकरांची बोचरी टीका

तर पालघरच्या जिल्हाप्रमुख यांनी संपर्कप्रमुख मिलिंद वैद्य आणि नेते विनायक राऊत यांच्यावर थेट गंभीर आरोप करत या सगळ्या घटनेचं खापर फोडलं आहे.

विश्वासात न घेता परस्पर पालघर जिल्ह्याच्या नियुक्त्या केल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये रोष असल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे. दुसरीकडे विनायक राऊत दमदाटी करत असल्याचा आरोप देखील पालघरच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे.